13 August 2020

News Flash

Video: धोनीच्या लाडक्या झिवासोबत विराटची मस्ती

इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला व्हिडिओ

धोनीच्या झिवासोबत गप्पा मारताना विराट कोहली

महेंद्रसिंह धोनीनंतर भारतीय संघाचं कर्णधारपद हे विराट कोहलीकडे आलं. आपल्या आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या विराट कोहलीची हळवी बाजूही आपण अनेकदा पाहिली आहे. महेंद्रसिंह धोनीची मुलगी झिवासोबत कोहलीचे सेल्फी अनेक वेळा सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. रांचीत पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतर कोहलीने धोनीच्या रांचीतल्या घराला भेट दिली. यावेळी धोनीची मुलगी झिवासोबतचा एक व्हिडिओ त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत कोहली आणि झिवाचा प्रेमळ संवाद सोशल मीडियावर नेटीझनच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे.

अवश्य वाचा – मालिका विजयाचा आनंद, विराट कोहलीचा शमीच्या मुलीसोबत डान्स

My reunion with Ziva. What a blessing it is to be around pure innocence

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

वन-डे मालिकेत ऑस्ट्रेलियावर ४-१ ने मात केल्यानंतर भारताने टी-२० सामन्यांच्या मालिकेतही १-० अशी आघाडी घेतली आहे. ३ सामन्यांच्या मालिकेत आता २ सामने खेळणं बाकी आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दुखापतींमुळे बेजार असून संघातले महत्वाचे खेळाडू हे अॅशेल मालिकेच्या तयारीसाठी मायदेशी परतले आहेत. त्यामुळे आगामी सामन्यांत भारतीय संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – Video: कोहलीचा ‘बुलेट थ्रो’ आणि धोनीही काही क्षणांसाठी भांबावला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2017 5:59 pm

Web Title: indian captain virat kohli shares adorable video with ms dhonis daughter ziva on instagram
टॅग Ms Dhoni,Virat Kohli
Next Stories
1 धोनीसाठी सौरव गांगुलीने करिअरचा त्याग केला – सेहवाग
2 Video: कोहलीचा ‘बुलेट थ्रो’ आणि धोनीही काही क्षणांसाठी भांबावला
3 पहिल्या टी-२० सामन्यात ‘या’ ९ विक्रमांची नोंद
Just Now!
X