भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) २०२८ साली होण्याऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला क्रिकेट संघाला खेळण्याची परवानगी दिली आहे. २०२८ ची ऑलिम्पिक स्पर्धा ही लॉस अँजेलिस येथे होणार आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत बीसीसीआयनं हा निर्णय घेतला आहे. तर महिला क्रिकेट संघ २०२२साली होण्याऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेतही सहभागी होणार आहे.

क्रिकेट ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी करण्यासाठी आयसीसीचे प्रयत्न सुरु होते. मात्र बीसीसीआय यासाठी तयार होत नव्हतं. अखेर शुक्रवारच्या बैठकीत ऑलिम्पिकसाठी बीसीसीआयनं हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र बीसीसीआनं यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. बीसीसीआयनं स्वायत्तता कायम राहावी यासाठी लिखित हमी मागितली आहे. कारण ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारे संघ राष्ट्रीय खेळ संघाच्या अंतर्गत येतात. तसेच भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अंतर्गत काम चालतं. त्यामुळे स्वायत्त असलेल्या बीसीआयनं भारतीय ऑलिम्पिक संघांच्या अंतर्गत काम करण्यास विरोध दर्शवला आहे.

IPL 2021 : पंजाबच्या डावाला सुरूंग लावत दीपक चहरने रचले नवे विक्रम

यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू विक्रमादीत्य सचिन तेंडुलकरने ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची मागणी केली होती. ऑलिम्पिकमध्ये समावेश झाल्यास क्रिकेटचा अजुन प्रसार होईल असंही सचिन म्हणाला होता. एक क्रिकेटपटू या नात्याने मला माझा खेळ अजुन मोठ्या स्तरावर पोहचलेला पहायला आवडेल. तो जानेवारी २०१९ मध्ये मुंबईमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होता.

भारतीय कुस्तीपटूंची तिहेरी सुवर्णकमाई

बीसीसीआयच्या बैठकीत इतरही मुद्द्यांवरही चर्चा झाली. २०२१ टी-२० विश्वचषकासाठीच्या नियोजनाबाबत रणनिती आखण्यात आली. दिल्ली, मुंबई, हैदराबात, धर्मशाला, चेन्नई, बंगळुरु, लखनौ, अहमदाबाद आणि कोलकातामध्ये स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखाली संघ या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर महिला वनडे विश्वचषकापूर्वी न्यूझीलंड दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच भारतीय दिव्यांग क्रिकेट परिषदेला मान्यता देण्यावरही एकमत झालं आहे.