आयपीएल म्हटलं की प्रत्येक सामन्यात काहीतरी नवीन घडामोडी पाहायला मिळतात. मैदानात किंवा मैदानाच्या बाहेरही आयपीएलशी निगडीत सर्वांचे लक्ष वेधणाऱया प्रसंगांनी आयपीएलची लोकप्रियता आणखी बहरत जाते. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजाएंट्स सामन्यातही सर्वांना खळखळून हसवणारा एक प्रसंग घडला. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा शांत स्वभावाचे जगभरात कौतुक केले जातेच पण त्याचा हजरजबाबीपणा देखील तितकाच लाजवाब आहे. धोनीने भर सामन्यात कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हीन पीटरसनची खिल्ली उडवून एकच धम्माल केली.

पुण्याच्या संघाचे क्षेत्ररक्षण सुरू असताना हा प्रकार घडला. दिपक चहार गोलंदाजी करत असताना पुण्याचा खेळाडू मनोज तिवारी स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करतेवेळीच माईकवरून थेट कॉमेंट्रबॉक्समध्ये बसलेल्या समालोचकांशी संवाद साधत होता. कॉमेंट्री बॉक्समधून समालोचक मनोज तिवारीशी पुण्याच्या संघाच्या तयारी इतर गोष्टींविषयी विचारपूस करत होते. तितक्यात केव्हीन पीटसरनने मनोज तिवारीकडे एक विनंती केली.
यष्टीरक्षण करत असलेल्या महेंद्रसिंग धोनीकडे जाऊन त्याला ‘मी तुझ्यापेक्षा खूप चांगलं गोल्फ खेळतो असं सांगशील का?’, अशी विनंती पीटरसनने मनोज तिवारीकडे केली. मनोज तिवारीने त्वरित धोनीकडे जाऊन पीटरसनचे म्हणणे त्याला सांगितले. धोनीने तात्काळ पीटरसनला जशास तसे प्रत्युत्तर देऊन हशा पिकवला. ”काही झालं तरी माझ्या कसोटी करिअरममध्ये पहिली विकेट मी पीटरसनची घेतली होती हे विसरू नका” असे धोनीने तिवारीच्या माईकवर सांगून पीटरसनचे तोंडच बंद केले. धोनीच्या प्रतिक्रियेवर कॉमेंट्री बॉक्समध्ये हशा पिकला. धोनीची ही हजरजबाबी प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. धोनीने पुन्हा एकदा ‘शेर शेर होता है’ हे सिद्ध करून दाखवले.

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: राहुल-क्विंटन चेन्नईला पडले भारी, लखनौचा दणदणीत विजय
Delhi Capitals vs Gujarat Titans Match Highlights in Marathi
GT vs DC : दिल्लीचा IPL मधील सर्वात मोठा विजय, घरच्या मैदानावर गुजरातचा ६ विकेट्सनी उडवला धुव्वा
CSK vs KKR Highlights Cricket Score in Marathi
IPL 2024 CSK vs KKR Highlights: ऋतुराजच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सीएसकेचा शानदार विजय, केकेआरवर ७ विकेट्सनी केली मात
Virat Creates History at Chinnaswamy Stadium
RCB vs LSG : विराटने चिन्नास्वामी स्टेडियमवर रचला इतिहास! अनोखं शतक झळकावणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील ट्विटमधील व्हिडिओ लिंकवर क्लिक करा-