आयपीएलचा अकरावा हंगाम सुरु होण्याआधी विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाला एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज नेथन कुल्टर-नाईल आपल्या दुखापतीमधून अद्याप सावरलेला नाहीये, या कारणामुळे आयपीएलचा अकरावा हंगाम कुल्टर-नाईल खेळू शकणार नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. कुल्टर-नाईलच्या जागी न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसनला रॉयल चँलेजर्सच्या संघात जागा देण्यात आली आहे.

अवश्य वाचा – विराटचा दीपिकासोबत जाहिरात करण्यास नकार; आरसीबीला ११ कोटींचा फटका?

रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाचा मुख्य प्रशिक्षक डॅनिअल व्हिटोरी यांनी कुल्टर-नाईलच्या दुखापतीबद्दल संघाची भूमिका जाहीर केली. कुल्टर-नाईल अतिशय गुणवान गोलंदाज असून त्याचं संघात नसणं ही आमच्यासाठी दुर्दैवी गोष्ट आहे. मात्र दुखापतीमधून कुल्टर-नाईलला सावरायला अजुन वेळ लागणार असल्यामुळे त्याच्या निर्णयाचा आम्ही मान राखत असल्याचं व्हिटोरीने स्पष्ट केलंय. कुल्टर-नाईलच्या अनुपस्थितीत कोरी अँडरसन संघासाठी उपयुक्त खेळाडू ठरेल असा आत्मविश्वास व्हिटोरी याने बोलून दाखवला.

अवश्य वाचा – आयपीएलसाठी धोनीचा कसून सराव, लगावले जोरदार फटके