इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) च्या ११ व्या मोसमातील आजच्या ३५व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू या संघांमध्ये लढत होत आहे. या लढतीसाठी चेन्नईच्या संघाने नाणेफेक जिंकली असून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने या मोसमात दमदार पुनरागमन केले आहे. तसेच प्रत्येक लढतीत उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. मात्र, मागच्या सामन्यात त्यांची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण दोन्हींमध्ये ते कमजोर दिसून येत होते. कर्णधार महेंद्र सिंह धोनी ने देखील ही गोष्ट मान्य केली होती.

दरम्यान, बंगळूरुने ९ बळींच्या बदल्यात २० षटकांत १२७ धावा केल्या. चेन्नईच्या अचूक माऱ्यासमोर बंगळूरुच्या संघ टप्प्याटप्प्याने गडगडला. या सामन्यात टीम साऊदीने एकाकी झुंज दिली. त्यामुळे बंगळूरूला चेन्नईला १२८ धावांचे आव्हान देता आले. त्यानंतर आधीपासूनच फॉर्ममध्ये असलेल्या चेन्नईच्या संघाने ६ गडी राखून बंगळूरूवर मात केली. त्यामुळे चेन्नईच्या खात्यात आणखी एका विजयाची भर पडली आहे. चेन्नईने १० पैकी ७ सामने जिंकले असून ३ सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली आहे. त्यामुळे १४ गुण मिळवत चेन्नई यंदाच्या आयपीएल मोसमात अव्वल स्थानावर पोहोचली आहे.

Updates  :