News Flash

IPL 2019 : एका धावाने पृथ्वीचं शतक हुकलं आणि विक्रमाची सुवर्णसंधीही

99 धावांवर पृथ्वी शॉ बाद

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सामन्यात सुपरओव्हरमध्ये दिल्लीने बाजी मारली. आयपीएलच्या बाराव्या हंगामातला सुपरओव्हरवर निकाल लागलेला हा पहिला सामना ठरला. विजयासाठी आवश्यक असलेल्या 11 धावा कोलकात्याचा संघ करु शकला नाही. कगिसो रबाडाने टिच्चून मारा करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

त्याआधी, कोलकात्याने दिलेलं 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर पृथ्वी शॉने आक्रमक फटकेबाजी केली. 55 चेंडूत पृथ्वीने 99 धावांची खेळी केली. या खेळीत 12 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. मात्र केवळ एका धावाने पृथ्वीचं शतक हुकलं. लॉकी फर्ग्युसनने पृथ्वीला यष्टीरक्षक दिनेश कार्तिककरवी बाद केलं. 99 धावांवर बाद झाल्यानंतर पृथ्वीने आणखी एक विक्रम आपल्या नावे करण्याची संधी गमावली. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू बनण्याचा मान पृथ्वीने केवळ एका धावेने गमावला.

2009 साली रॉयस चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणाऱ्या मनिष पांडेने 19 वर्ष आणि 253 दिवशी डेक्कन चार्जर्सविरुद्ध शतक झळकावलं होतं. 19 वर्ष 141 दिवसांच्या पृथ्वी शॉकडे शनिवारी झालेल्या सामन्यात हा विक्रम मोडण्याची संधी होती. मात्र या संधीचं सोन करणं त्याला जमलं नाही. याचसोबत आयपीएलमध्ये केवळ एका धावाने शतक हुकणारा पृथ्वी शॉ तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी सुरेश रैना आणि विराट कोहलीचं एका धावाने शतक हुकलं होतं. मात्र सुरेश रैना 99 धावांवर नाबाद राहिला होता.

फिरोजशहा कोटला मैदानावर दोन्ही संघांमध्ये झालेला हा सामना चांगलाच रंगला. मात्र निर्धारित षटकांमध्ये सामना अनिर्णित अवस्थेत सुटल्यामुळे, अखेरीस सुपरओव्हरमध्ये दिल्लीने सामन्यात बाजी मारली.

अवश्य वाचा – Video : ऋषभ पंतचा हा भन्नाट झेल पाहिलात का??

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2019 2:20 pm

Web Title: ipl 2019 dc vs kkr prithvi shaw misses unique record
टॅग : IPL 2019
Next Stories
1 Video : ऋषभ पंतचा हा भन्नाट झेल पाहिलात का??
2 IPL 2019 : असा रंगला दिल्ली-कोलकाता Super Over चा थरार
3 IPL 2019 : गांगुलीला दणका; लवाद अधिकाऱ्यांकडे तक्रार
Just Now!
X