ऋषभ पंतची (७८) धडाकेबाज नाबाद खेळी आणि शिखर धवनचे (५४) अर्धशतक यांच्या बळावर दिल्लीने राजस्थानला ६ गडी राखून पराभूत केले. सलामीवीर अजिंक्य रहाणेच्या नाबाद १०५ धावा आणि कर्णधार स्मिथचे दमदार अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान दिलेल्या १९१ धावांचे आव्हान दिल्लीने सहा गडी आणि ४ चेंडू राखून पूर्ण केले. या विजयाबरोबरच दिल्लीचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहचला आहे. तर मागील अनेक दिवसांपासून पहिल्या स्थानावर असणाऱ्या चेन्नईच्या संघाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. आज हैद्राबादबरोबर सामना जिंकून पुन्हा अव्वल स्थान पटकावण्याची संधी चेन्नईला आहे.

मागील दोन्ही सामन्यामध्ये दिल्लीने विजय मिळवला तर चेन्नईचा मागील दोन सामन्यांमध्ये पराभव झाल्याने चेन्नईची गुणतालिकेत घसरण झाली. यंदाच्या हंगामातील ४० व्या सामन्यानंतर गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या स्थानी आहे पाहुयात.

संघ सामनेविजयपराभवनेट रनरेटगूण
दिल्ली कॅपिटल्स११+०.१८११४
चेन्नई सुपरकिंग्ज१०+०.०८७१४
मुंबई इंडियन्स१०+०.३५७१२
सनराईजर्स हैदराबाद+०.७३७१०
किंग्ज इलेव्हन पंजाब१०-०.०४४१०
कोलकाता नाईट रायडर्स१०-०.०१३
राजस्थान रॉयल्स१०-०.४७०
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु१०-०.८३६