इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या हंगामाला (IPL 2020) अजून बराच अवधी शिल्लक आहे. पण त्या दरम्यान IPL 2020 बाबत एक महत्त्वाची गोष्ट समजत आहे. IPL 2020 ची सुरुवात एप्रिल महिन्यात होणार असा अंदाज असून यासाठी पार पाडण्यात येणारी लिलाव प्रक्रिया डिसेंबर महिन्यात होण्यार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, IPL ची डिसेंबरमधील प्रक्रिया ही छोटेखानी लिलाव प्रक्रिया असणार आहे. यंदाच्या लिलाव प्रक्रियेमध्ये प्रत्येक संघाला अधिक ३ कोटी रूपये खर्च करता येणार आहेत. म्हणजेच आता संघांना खेळाडूंसाठी एकूण ८६ कोटी रूपयांपर्यंत खर्च करता येणार आहे. तसेच जर लिलाव प्रक्रिया डिसेंबर महिन्यात होणार असेल, तर IPL व्यवस्थापनाकडून लवकरच प्रत्येक संघाला आपल्याकडील खेळाडू रिलीज करण्यासाठी अंतिम मुदत लवकरच देण्यात येईल.