पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल पुन्हा एकदा कमनशिबी ठरला आहे. मुंबईत खेळल्या गेलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात राहुलने अर्धशतक ठोकले. पण, त्याच्या संघाला पराभव पत्करावा लागला. 2018पासून पराभव स्वीकारणाऱ्या संघाकडून सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा करणाऱ्यांमध्ये राहुलने अग्रस्थान मिळवले आहे.

 

विशेष म्हणजे आज 18 एप्रिलला राहुलने 29व्या वर्षात पदार्पण केले. त्यामुळे विजय मिळवून वाढदिवस साजरा करण्यासाठी राहुल उत्सुक होता. मात्र, दिल्लीने त्याला निराश केले. 2018पासून पराभव स्वीकारणाऱ्या संघाकडून सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा करणाऱ्यांमध्ये मनीष पांडे दुसऱ्या स्थानी आहे.

असा रंगला सामना..

मुंबईच्या वानखेडेवर रंगलेल्या आयपीएलच्या 11व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जच्या 196 धावसंख्येच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या 92 धावांच्या शानदार खेळीमुळे दिल्लीने पंजाबवर 6 गडी राखून हा विजय मिळवला. नाणेफेक गमावलेल्या पंजाबने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर 20 षटकात 4 बाद 195 धावा केल्या होत्या. पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी अर्धशतके रचत संघासाठी बहुमुल्य योगदान दिले. राहुलने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 61 धावांची खेळी केली. मात्र, पंजाबचे गोलंदाज दिल्लीच्या फलंदाजांवर लगाम घालू शकले नाहीत. धवनला सामनावीर पुरस्कार मिळाला.

2018 पासून आयपीएलमधील पराभवांमध्ये सर्वाधिक 50+ धावा