आयपीएलच्या 14व्या पर्वाला आजपासून सुरुवात होत आहे. सलामीच्या लढतीसाठी गतविजेत्या मुंबई इंडियन्ससमोर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान असणार आहे. चेन्नईतील चेपॉक मैदानावर दोन्ही संघ पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी उत्सुक आहेत. मुंबई आणि बंगळुरू आतापर्यंत 29 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी 19 सामने मुंबईने, तर 10 सामने बंगळुरूने जिंकले आहेत.

मुंबईचा संघ यंदाही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. मुंबईने आतापर्यंत 5वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर केला आहे. तर, 2019 आणि 2020 या दोन वर्षात त्यांनी लागोपाठ विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे विजेतेपदाची हॅटट्र्कि साधण्याचे लक्ष समोर ठेऊन ते आयपीएलच्या मोहिमेला प्रारंभ करतील. दुसरीकडे, कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ हा हंगाम आपल्या नावावर करण्यासाठी धडपड करताना दिसणार आहे. गेल्या 8 हंगामात मुंबईला पहिल्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2012मध्ये त्यांनी चेन्नईविरुद्ध अखेरची विजयी सलामी मिळवली होती. तर, मागील 13 हंगामापासून बंगळुरूला चेपॉक स्टेडियमवर एकही लढत जिंकता आलेली नाही. 2008मध्ये पहिल्या हंगामातच त्यांनी येथे अखेरचा विजय मिळवला होता.

धोनी ब्रिगेड ‘फास्ट ट्रॅक’वर! ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ जलदगती गोलंदाज ताफ्यात दाखल!

मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड या अनुभवी फलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. तर, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन मुंबईची ताकद असणार आहेत. मुंबई इंडियन्समधील बोल्ट-बुमराच्या जोडीने गेल्या हंगामात अक्षरश: कहर केला होता. या जोडीने 13व्या हंगामात एकूण 52गडी बाद केले होते. बुमराने 27 तर बोल्टने 25 गडी बाद केले होते.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे विराट कोहलीसह एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल अशी तगडी फलंदाजांची मोट आहे. तर देवदत्त पडिक्कल आणि मोहम्मद अझरूद्दीन हे आपली छाप पाडण्यासाठी उत्सुक आहेत. मागचा अनुभव पाहता बंगळुरूला आपल्या गोलंदाजीवर विशेष भर द्यावा लागणार आहे. गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे आतापर्यंत बंगळुरूला एकही जेतेपद जिंकता आले नाही. त्यामुळे यंदा मोहम्मद सिराज, काईल जेमिसन, केन रिचर्डसन, नवदीप सैनी या वेगवान गोलंदाजांवर संघाची मदार असणार आहे. तर, फिरकीपटू यजुर्वेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर हे आपल्या फिरकीच्या जाळ्यात मुंबईच्या खेळाडूंना गुंतवतात का, याकडेही लक्ष असणार आहे.

संध्याकाळी 7:30 पासून सामन्याला सुरुवात होईल.

ऑनलाइन बुद्धिबळात फसवणूक करणे सोपे!

दोन्ही संघ 

मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, जेम्स नीशम, नॅथन कुल्टर-नाईल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, पीयुष चावला, धवल कुलकर्णी , सौरभ तिवारी, आदित्य तरे, अ‍ॅडम मिलने, ख्रिस लिन, जयंत यादव, अनमोलप्रीतसिंग, क्विंटन डिकॉक, अनुकुल रॉय, मोहसिन खान, अर्जुन तेंडुलकर, मार्को जानसेन, युधवीर सिंग चरक.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद अझरुद्दीन, डॅनियल ख्रिश्चन, वॉशिंग्टन सुंदर, काईल जेमीसन, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, यजुर्वेंद्र चहल, केन रिचर्डसन, हर्षल पटेल, अ‍ॅडम झम्पा, सचिन बेबी, श्रीकर भारत, पवन देशपांडे, रजत पाटीदार, फिन एलन, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद,