मुंबई इंडियन्स संघाच्या पराभवी मालिकेचे कारण शोधण्यात कर्णधार रोहीत शर्मालाही कठीण जात आहे. संघाकडून सुरू असलेली खराब फलंदाजी एक समस्या झाली असल्याचे रोहीत म्हणाला.
रोहीत शर्मा म्हणाला की, “संघात फलंदाज उत्कृष्ट क्षमतेचे असूनही गेले चारही सामने काहीच घडताना दिसले नाही. फलंदाजी संघासाठी समस्या झाली असल्याची कामगिरी गेल्या चारही सामन्यांत दिसून आली आहे. १२६ इतकी कमकुवत धावसंख्या उभारणे संघाचे उद्दीष्ट नाही. गोलंदाजांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता यावी यासाठी चांगली धावसंख्या उभारणे गरजेचे आहे. फलंदाजांची क्रमावारी बदलण्याचेही प्रयत्न केले परंतु, हाती निराशाच लागली आहे. संघाच्या फलंदाजीत सुधारणा होण्याची गरज आहे. पुढील काही सामने जिंकून स्पर्धेत पुनरागमन करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे.” असेही रोहीत शर्मा पुढे म्हणाला.