‘आयपीएल’च्या सातव्या हंगामाच्या ‘क्वालिफायर-१’ मध्ये या हंगामातील बलाढ्य किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला धूळचारत कोलकाता नाईट रायडर्स संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे.
कोलकाताच्या १६४ धावांचा पाठलाग करताना पंजाबचे ‘किंग्ज’ फलंदाज स्वस्तात बाद करण्यात कोलकाताच्या गोलंदाजांना यश आले.
मिलर, मॅक्सवेलची जादू या सामन्यात चालली नाही. कर्णधार जॉर्ज बेली जरी नाबाद राहीला तरी वीस षटकांच्या अखेरीस पंजाबला अवघ्या १३५ धावांत रोखण्यात कोलकाताला यश आले आहे. या विजयामुळे कोलकाताच्या या हंगामाचे विजेतेपद मिळविण्याच्या आशा प्रफुल्लित झाल्या आहेत.
कोलकाताकडून सलामीवीर रॉबिन उथप्पाने ४२ धावांची खेळी केली. त्यात शाकीब अल हसन, पांडे, युसुफ पठाण यांनी योगदान देऊन संघाच्या धावसंख्येला १६३ चा आकडा गाठून दिला होता.
या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबची सुरूवातच डळमळीत झाली. सेहवाग मैदनात आला तसाच त्वरित बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर व्रिद्यमान सहाला वगळता इतर कोणत्याही फलंदाजाने साजेशी कामगिरी केली नाही आणि सरतेशेवटी पंजाबला केवळ १३५ धावा करता आल्या. त्यामुळे कोलकाताने पंजाबवर एकूण २८ धावांनी विजय मिळविला.

सामन्याचे अपडेट्स-