आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सध्या प्रत्येक संघ आपापली रणनिती आखतो आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या नियमानुसार खेळाडूंची देवाण-घेवाण व कायम राखण्यासाठी आजचा दिवश शेवटचा होता. यानुसार सनराईजर्स हैदराबाद संघाने आपल्या संघातील ९ खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. हैदराबादच्या संघाने याआधीच शिखर धवनला करारमुक्त करत त्यांच्या बदलात शाहबाज नदीम, अभिषेक शर्मा आणि विजय शंकर यांना संघात स्थान दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१८ साली बॉल टॅम्परिंग प्रकरणी निलंबीत केलेल्या डेव्हिड वॉर्नरला यंदा हैदराबादच्या संघात स्थान देण्यात आलं आहे. वॉर्नरच्या बदल्यात संघात घेण्यात आलेल्या अॅलेक्स हेल्सला हैदराबादने करारमुक्त केलं आहे. १७ व १८ डिसेंबरला आयपीएलच्या आगामी हंगामासाठी लिलाव होण्याची शक्यता आहे.

२०१९ आयपीएलसाठी हैदराबादने कायम राखलेले खेळाडू –

बसिल थम्पी, भुवनेश्वर कुमार, दिपक हुडा, मनिष पांडे, नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, सय्यद खलिल अहमद, युसूफ पठाण, बिली स्टॅनलेक, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, मोहम्मद नबी, राशिद खान, शाकीब अल-हसन

२०१९ आयपीएलसाठी हैदराबादने करारमुक्त केलेले खेळाडू –

सचिन बेबी, तन्मय अग्रवाल, वृद्धीमान साहा, ख्रिस जॉर्डन, कार्लोस ब्रेथवेट, अॅलेक्स हेल्स, बिपुल शर्मा, सय्यद मेहदी हसन, शिखर धवन

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl auction 2019 sunrisers hyderabad release 9 players
First published on: 15-11-2018 at 19:29 IST