Irfan Pathan IPL 2020 team of the season : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने आयपीएल २०२० च्या ड्रीम टीमची निवड केली आहे. इरफाननं कामगिरीची आधारे संघाची निवड केली आहे. मात्र, विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गज खेळाडूंना इरफान पठाण आपल्या संघात स्थान दिलं नाही.
इरफान पठाणनं आपल्य संघात सात भारतीय आणि चार विदेशी खेळाडूंची निवड केली आहे. इरफान पठाणने आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा तसेच हैदराबादमधील राशीद खान यांची निवड केली नाही. रोहितनं आपल्या संघाला पाचव्यांदा जेतेपद मिळवून दिलं तर विराट कोहलीनं आरसीबीला प्ले ऑफ पर्यंत पोहचलवलं होतं.
सलामीसाठी राहुल आणि शिखर धवन यांची निवड केली आहे. फक्त चार विदेशी खेळाडू ठेवायचे असल्यामुळे वॉर्नरची निवड केली नाही, असं पठाण म्हणाला. इरफान पठाणनं तिसऱ्या क्रमांकासाठी सुर्यकुमार यादव याची निवड केली तर चौथ्या क्रमांकावर डिव्हिलिअर्सला निवडलं आहे. डिव्हिलिअर्सकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी दिली आहे.
इरफान पठानने कायरन पोलार्डला आपल्या ड्रीम संघाचा कर्णधार केलं आहे. पोलार्ड पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. हार्दिक पांड्या गोलंदाजी करु शकत नाही त्यामुळे त्याची निवड केली नाही. सहाव्या स्थानावर दिल्लीकर स्टॉयनिसची निवड केली आहे. तसेच राहुल तेवातियाचीही निवड इरफान पठाणने केली आहे. तीन अष्टपैलू खेळाडूसह चार गोलंदाज निवडले आहेत. चहल, रबाडा, बुमराह आणि शामी यांच्यावर गोलंदाजीचा भार सोपवला आहे.
आयपीएल २०२० मधील इरफान पठाणची ड्रीम टीम –
केएल राहुल, शिखर धवन, सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स, मार्कस स्टॉयनिस, राहुल तेवातिया, युजवेंद्र चहल, कगिसो रबाडा, जसप्रीत बुमराह, शामी
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 18, 2020 9:29 am