विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात इशांत शर्माविना कसोटी मालिका खेळावी लागणार आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत असताना इशांतला दुखापत झाली होती, ज्यानंतर तो भारतात परतला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कसोटी मालिकेत इशांतला स्थान देण्यात आलं होतं. परंतू त्याआधी तो NCA मध्ये आपल्या फिटनेसवर भर देत होता.
गेल्या काही दिवसांत इशांतमध्ये सुधारणा दिसून येत होती. परंतू कसोटी मालिका खेळण्याइतपत इशांत फिट नसल्याचं लक्षात येताच बीसीसीआयने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे इशांत शर्मा कसोटी मालिका खेळणार नाहीये. बीसीसीआयने गुरुवारी रात्री याबद्दल प्रसिद्धीपत्रक काढत माहिती दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2020 9:20 am