गिऊसेप्पे रोस्सी, अँटोनियो कस्सानो, सिरो इमोबिले आणि मट्टिआ डेस्ट्रो यांना फिफा विश्वचषकासाठीच्या ३० जणांच्या संघात स्थान देत प्रशिक्षक सेसारे प्रांडेली यांनी इटलीच्या संभाव्य संघाची घोषणा केली. १० दिवसाच्या सराव शिबिरानंतर २ जून रोजी इटलीचा अंतिम संघ निवडला जाणार आहे.
इटलीचा संभाव्य संघ
गोलरक्षक : गियानलुइगी बफन, मट्टिआ पेरिन, सॅल्वाटोरे सिरिगू, अँटोनियो मिरान्टे. बचावफळी : इग्नाटियो अबाटे, आंद्रिया बार्झाग्ली, लिओनाड्रो बोनूक्की, जॉर्जियो चिएलिनी, मट्टेओ डार्मिएन, मट्टिआ डे स्किग्लिओ, ख्रिस्तियान मॅगीओ, गॅब्रियल पॅलेट्टा, मॅन्युअल पास्कल, आंद्रिया रँकोचिया. मधलीफळी : अल्बटरे अकिलानी, डॅनियल डे रोस्सी, क्लॉडियो मार्चिसियो, रिकाडरे माँटेलिव्हो, थिआगो मोट्टा, मार्को पारोलो, आंद्रिया पिलरे, रोमूलो, मार्को वेराट्टी. आघाडीफळी : मारियो बालोटेल्ली, अँटोनियो कस्सानो, अलेसांड्रो सेर्सी, मट्टिआ डेस्ट्रो, सिरो इमोबिले, लोरेन्झो इसिग्ने, गिऊसेप्पे रोस्सी.