07 March 2021

News Flash

विराट म्हणतो, मला जाणून घ्यायचंय? मग हा व्हिडीओ बघाच

भारतीय कर्णधार विराट कोहलीचे चाहत्यांची संख्या अगणित आहे.

भारतीय कर्णधार विराट कोहलीचे चाहत्यांची संख्या अगणित आहे. भारतासह विदेशातही विराट कोहलीचे चाहते आहेत. विराट कोहलीबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा असते. चाहत्यांसाठी विराट कोहलीची खास मुलाखत आली आहे. कोहलीने आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मला आणखी जाणून घेणाऱ्यासाठी व्हिडीओची लिंक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्याला काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. विराट कोहलीची संपुर्ण मुलाखत ‘ विराट कोहली अॅप’वर अपलबद्ध आहे.

आपल्या चाहत्यासाठी विराट कोहलीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याला एक प्रश्न विचारला आहे. त्याचे संघामध्ये आलेल्या नवीन खेळाडूला तू सिनियर असल्याचे वाटते का? त्यावर विराट कोहली म्हणतो, याबाबतीत मी ८ व्या स्थानावर आहे. आणि मनोसोक्त हसायला सुरूवात करतो.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये दोन कसोटी सामने जिंकले आहेत. चार कसोटी सामन्याच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. पुढील कसोटी सामना जिंकून अथवा बरोबरीत राखून भारतीय संघ मालिका विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 4:37 pm

Web Title: ive got something for everyone who want to get to know me better says virat
Next Stories
1 ICC Test Ranking : बुमराह एक्स्प्रेस सुसाट! टीम इंडिया, विराट अव्वलस्थानी कायम
2 मराठमोळी स्मृती मानधना ठरली यंदाची सर्वोत्तम क्रिकेटपटू
3 अभिमानास्पद! भारताची हरमनप्रीत कौर ICCच्या टी२० संघाची कर्णधार
Just Now!
X