जसप्रीत बुमराह हा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज आहे. भारतीय संघाच्या गोलंदाजीची भिस्त बहुतांश वेळा बुमराहवरच असते. बुमराहने आपल्या कामगिरीने कायम स्वत:ला सिद्ध केले आहे. मुंबई इंडियन्सचा संघ असो किंवा टीम इंडिया असो; बुमराह कायम फलंदाजांचा कर्दनकाळ ठरला आहे. पण पाकिस्तानचा अष्टपैलू गोलंदाज अब्दुल रझाक याला मात्र बुमराहचे गोलंदाजीतील श्रेष्ठत्व मान्य नाही. माझ्या काळी जर बुमराह गोलंदाजी करत असता, तर मी त्याच्या गोलंदाजीवर सहज फटकेबाजी केली असती, असे तो काही महिन्यांपूर्वी म्हणाला होता. त्यातच आता रझाकने त्याला ९० च्या दशकातील गोलंदाजांच्या तुलनेत कमी प्रभावी म्हटले आहे.

लॉकडाउन स्पेशल… रोहितने भन्नाट कमेंट करत युवराजला केलं ट्रोल

“माझं बुमराहशी वैयक्तिक पातळीवर काहीही वैर नाही. मी बुमराहला बच्चा म्हटलं, कारण मी त्याला ग्लने मॅकग्रा, वासीम अक्रम, कर्टली अ‍ॅम्ब्रोज, शोएब अख्तर यांच्याशी तुलना करत होतो. त्या सगळ्या गोलंदाजांचा सामना करणं खूप कठीण होतं. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. बुमराह सध्या ‘जगात भारी’ गोलंदाज बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण आमच्या काळात असलेले गोलंदाज अधिक प्रभावी होते. त्यांचा सामना करणं खूप कमी जणांसाठी शक्य झालं. हल्लीच्या गोलंदाजांचा सामना करताना फारसे दडपण नसते. १०-१५ वर्षांपूर्वी क्रिकेटपटू अधिक प्रतिभावान होते. पण, क्रिकेटसाठी सध्याचा काळ थोडा वाईटच आहे”, असे पीटीआयशी बोलताना रझाक म्हणाला.

रोहितचा २६४ धावांचा विक्रम कोण मोडणार? श्रीसंतने दिलं उत्तर

माजी पाकिस्तानी खेळाडू अब्दुल रझाक

आधी काय म्हणाला होता रझाक?

“मी जेव्हा क्रिकेट खेळायचो, तेव्हा माझ्यासमोर जगातील सर्वोत्तम गोलंदाज गोलंदाजी करायचे. मी भल्या-भल्या गोलंदाजांसमोर फलंदाजी केली आहे. त्यामुळे बुमराहचे कौतुक मला सांगू नका. जर तो माझ्यावेळी गोलंदाजी करत असता, तर कामगिरीचे दडपण त्याच्यावर असते. मी तर त्याची गोलंदाजी सहज ठोकून काढली असती. मी माझ्या काळात ग्लेन मॅकग्रा आणि वसीम अक्रम यांच्या सारख्या गोलंदाजांसमोर खेळलो आहे. माझ्यासाठी बुमराह एकदम ‘बच्चा’ आहे”, अशी दर्पोक्ती अब्दुल रझाकने केली होती.

स्टेनच्या संघात भारतीय खेळाडू नाही; डीव्हिलियर्सही संघाबाहेर

“जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला खूप चांगली कामगिरी करताना दिसतो आहे. त्याने स्वत:मध्ये प्रचंड सुधारणा केली आहे. त्याची गोलंदाजीची शैली काहीशी विचित्र आणि वेगळी आहे. त्यातच चेंडूच्या सीमचा (शिवणीचा) योग्य वापर कसा करावा हे त्याला ठाऊक आहे. त्यामुळेच तो खूप परिणामकारक गोलंदाज ठरतो. पण मी माझ्या काळात अनेक प्रतिभावान आणि वेगवान गोलंदाजांचा सामना केला आहे. त्यामुळे माझ्या वेळी बुमराह असता, तर मला गोलंदाजी करताना बुमराहवरच दडपण आले असते. मी त्याच्या गोलंदाजीवर सहज चौकार-षटकार खेचले असते”, असेही रझाक म्हणाला होता.