करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांना करोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडास्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतात धर्म मानल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धादेखील काही काळ स्थगित करण्यात आल्या असून IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आणि सावधनता बाळगण्याचा सल्ला देत आहेत. काही लोक पूर्णपणे आराम करत आहेत. काही क्रिकेटपटू टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. काही क्रिकेटपटू लाइव्ह चॅटमध्ये व्यस्त आहेत.

‘टीम इंडिया’ला धक्का! क्रिकेट स्पर्धा बंद असूनही गमावलं अव्वल स्थान, कारण…

भारताचा क्रिकेटपटू श्रीसंतदेखील नुकताच एका लाईव्ह चॅटमध्ये सहभागी झाला. हेलो नावाच्या अ‍ॅपवर त्याने लाईव्ह चॅटच्या माध्यमातून मुलाखत दिली. त्यात त्याला विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यापैकी एक प्रश्न असा होता की भारताचा तडाखेबाज फलंदाज रोहित शर्मा याची एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या २६४ आहे. आतापर्यंत तो विक्रम कोणीही मोडू शकलेला नाही. पण यापुढे कोणता फलंदाज तो विक्रम मोडू शकतो? असा प्रश्न श्रीसंतला विचारण्यात आला.

लाजिरवाण्या ११ खेळाडूंच्या यादीत मुंबईकर अजित आगरकरचं नाव; जाणकार, चाहते संतापले

या प्रश्नावर श्रीसंतने छान उत्तर दिले. श्रीसंत म्हणाला, ” रोहित शर्मा हा खूपच प्रतिभावान खेळाडू आहे. रोहितचा २६४ धावांचा विक्रम हा अप्रतिम आहे. त्यामुळे कदाचित रोहितचा हा विक्रम स्वत: रोहितच मोडू शकेल. कारण वन डे क्रिकेटमध्ये त्रिशतक मारण्याचे सामर्थ्य फक्त रोहितमध्ये आहे. याशिवाय विराट कोहली, लोकेश राहुल किंवा बेन स्टोक्स या खेळाडूं मध्येदेखील हा विक्रम मोडण्याची क्षमता आहे”, असे उत्तर श्रीसंत म्हणाला.

भारतीय क्रीडाक्षेत्राला धक्का! यजमानपदाचे हक्क गमावण्याची नामुष्की

तब्बल सात वर्षांनंतर श्रीसंतचा क्रिकेट खेळण्याचा मार्ग मोकळा

IPL स्पर्धेदरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेला क्रिकेटपटू श्रीसंतला २० ऑगस्ट २०१९ ला अखेर BCCI कडून दिलासा मिळाला. सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतची बाजू ऐकून घेऊन त्यावर ३ महिन्याच्या आत पुनर्विचार करण्याचे आदेश BCCI ला १५ मार्च २०१९ रोजी दिले होते. त्यानंतर लोकपाल डी. के. जैन हे श्रीसंतबद्दल निर्णय घेतील असा निर्णय BCCI ने घेतला होता. त्यानुसार २० ऑगस्टला अखेर त्याच्यावरील आजीवन बंदी हटवण्यात आली असून त्याला २०२० मध्ये क्रिकेटच्या मैदानावर परतता येणार आहे.