IPL स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक चार वेळा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यात मुंबईच्या फलंदाजांची आणि गोलंदाजांची महत्त्वाची आहे. २०१९ च्या अंतिम सामन्यात तर मुंबईला शेवटच्या टप्प्यात जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा या दोघांनी तारलं. त्या दोघांच्या गोलंदाजीमुळे मुंबईला चौथ्यांदा विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली. पण सध्या हे दोन गोलंदाज एका वेगळ्या विषयामुळे चर्चेत आले आहेत. भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने लसिथ मलिंगाबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केले आहे.
आणखी वाचा – IPL 2020 : अशी आहे मुंबई इंडियन्सची ‘पलटण’
मलिंगाबद्दल काय म्हणाला बुमराह?
“अनेकांना वाटतं की लसिथ मलिंगाने मला यॉर्कर चेंडू कसा टाकायचा? ते शिकवलं. पण ते चुकीचं आहे. त्याने मला मैदानावरील कोणत्याही गोष्टी शिकवल्या नाहीत. मी त्याच्याकडून काही शिकलो असेल तर ते म्हणजे विचार करण्याची पद्धत… वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये गोलंदाजाने स्वत:ला कशाप्रकारे विचार करावा, गोष्टी मनासारख्या घडत नसतील तरी गोलंदाजाने रागवायचे नाही, ठराविक फलंदाजासाठी ‘प्लॅन’ कसा आखावा, अशा काही गोष्टी मी त्याच्याकडून समजून घेतले आणि शिकलो”, असे बुमराहने मुलाखती दरम्यान सांगितलं.
IND vs SL : टी २० मालिकेत ‘या’ ३ खेळाडूंच्या कामगिरीवर असेल लक्ष
रबरी चेंडू आणि यॉर्करचं कनेक्शन
लहानपणी आम्ही रबरी चेंडूने खेळायचो. त्याला शिवणीसारखे (सीम) डिझाईन असायचे. त्यामुळे ते चेंडू स्विंग व्हायचे. आम्ही जिथे खेळायचो; तिथे सीम मुव्हमेंट, विविध टप्प्यावरील गोलंदाजी किंवा यष्टीरक्षण अशा गोष्टी नसायच्या. केवळ चेंडू फलंदाजाच्या अंगावर टाकणे आणि पायात गोलंदाजी करून त्याला बाद करणे हाच आमचा उद्देश असायचा. जर तुम्हाला गडी बाद करायचा असेल, तर यॉर्कर चेंडू टाका असा साधा नियम आम्ही लहानपणापासूनच शिकलो. अजूनही त्याच एका गोष्टीमुळे मी यशस्वी गोलंदाज ठरतो, असे बुमराहने नमूद केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 3, 2020 3:40 pm