News Flash

बुमराहने पुन्हा घेतली ‘नो बॉल’वर विकेट; नेटकऱ्यांनी झोडपले

बुमराहने टाकलेल्या चेंडूवर कर्णधार जो रूट पायचीत झाल्याचे अपील भारतीय खेळाडूंनी केले, पण...

जसप्रीत बुमराह (संग्रहीत छायाचित्र)

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने टी२० विश्वचषक २०१६ मध्ये विंडीजविरुद्ध नो बॉलवर सलामीवीर सिमन्सला बाद केले. पण नो बॉल असल्याने सिमन्सला बाद देण्यात आले नाही आणि पुढे याच सिमन्सने वादळी खेळी करून भारताला पराभूत केले. तेव्हापासून सुरु झालेले बुमराहमागचे शुक्लकाष्ठ अद्यापही संपण्याचे नाव घेत नाही. २०१७ च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतही अशाच प्रकारच्या ‘नो-बॉल विकेट’ला बुमराहला सामोरे जावे लागले होते. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. या दौऱ्यातील शेवटचे २ कसोटी सामने शिल्लक आहेत. पण जसप्रीत बुमराहमागील नो बॉलचे शुक्लकाष्ठ या मालिकेतही सुरूच आहे. आजपासून या मालिकेतील चौथा सामना सुरु झाला आहे. पण गेल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यातही भारताच्या जसप्रीत बुमराहने नो बॉल वर बळी टिपला.

बुमराहच्या चेंडूवर कर्णधार जो रूट पायचीत झाल्याचे अपील भारतीय खेळाडूंनी केले. पण पंचांनी त्याला नाबाद ठरवल्यानंतर भारताने DRSचा वापर केला. पण या DRSमध्ये बुमराहने नो बॉल टाकल्याचे निष्पन्न झाले आणि भारताने मिळविलेली संधी गमावली. सोबतच रिव्ह्यूदेखील फुकट गेला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना पाचव्या दिवशी संपला. हा सामना भारताने २०३ धावांनी जिंकला. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ९ बळी गमावले होते. एका बळीसाठी पाचव्या दिवसाचा खेळ खेळावा लागला होता. हा सामना चौथ्या दिवशीच संपू शकला असता, पण जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर एक गडी बाद झाला असताना तो नो बॉल असल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यावेळी बुमराहवर सोशल मीडियावरून टीका झाली होती. आजही या नो बॉलनंतर पुन्हा एकदा सोशल मीडियातून त्याच्यावर टीका झाली. तसेच तो विनोदाचा विषयही ठरला.

 

 लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 6:41 pm

Web Title: jasprit bumrah trolled by internet users after no ball wicket in 4th test
Next Stories
1 Asian Games 2018 : भूमीपुत्र नसल्यामुळे सुवर्णपदक विजेत्या अरपिंदरला हरियाणा सरकारने बक्षिस नाकारलं
2 Ind vs Eng : ३९ व्या कसोटीत विराट कोहलीने मोडली परंपरा
3 Ind vs Eng 4th test – Live : कुर्रानने भारताला रडवले, प्रत्त्युत्तरात भारत दिवसअखेर बिनबाद १९
Just Now!
X