30 September 2020

News Flash

ISSF World Championship : एअर रायफल नेमबाजीत भारताच्या ह्रदय हजारिकाला सुवर्णपदक

महिलांनाही सांघिक प्रकारात सुवर्णपदक

ह्रदय हजारिका सुवर्णपदकासह

कोरियात सुरु असलेल्या ISSF World Championship स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी पदकांची लयलूट सुरुच ठेवली आहे. १० मी. एअर रायफल नेमबाजी प्रकारात भारताच्या ह्रदय हजारिकाने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तर सांघिक प्रकारातही भारतीय महिलांनी सुवर्णपदकाची कमाई करत भारताच्या खात्यात आणखी एक पदक टाकलं.

पात्रता फेरीत भारताकडून ह्रदयने अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केलं होतं. अंतिम फेरीत शेवटच्या संधीत गुणांची बरोबरी झाल्यानंतर शूटऑफमध्ये ह्रदयने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. महिलांमध्ये एलवेनिल वाल्वारियन, श्रेया अग्रवाल, मनिनी कौशिक यांनी धडाकेबाज कामगिरी करत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदकाची भर घातली. मात्र ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताच्या पुरुष संघाने निराशाजनक कामगिरी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2018 12:23 pm

Web Title: junior shooters deliver two gold for india at issf world championships
Next Stories
1 Ind vs Eng : इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतला पराभव हे फलंदाजांचं अपयश – अजिंक्य रहाणे
2 आमच्याविरोधात खेळताना भारतावर दबाव – हसन अली
3 हिमा दासचं गुवाहटी विमानतळावर अनोखं स्वागत
Just Now!
X