मुकुंद धस

युवा राष्ट्रीय  बास्केटबॉल स्पर्धा

केरळने यजमान तमिळनाडूचा ७९-६९ (२०-१४, २१-१३, २१-१९, १७-२३) असा फडशा पाडून ३६व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेतील मुलींचे विजेतेपद पटकावले. मुलांमध्ये हरयाणाने केरळचा ८४-७१ असा पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावले. सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजविलेल्या विजेत्यांना यजमानांनी दुसऱ्या सत्रात लढत देण्याचा प्रयत्न केला. परंतु उंचीने सरस असलेल्या विजेत्यांनी यजमानांची डाळ शिजू दिली नाही. आंतरराष्ट्रीय अ‍ॅन मेरी झकारिया (३९) केरळच्या विजयाची शिल्पकार होती.