भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज खलिल अहमद, भारत अ संघातून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. २२ जानेवारी रोजी न्यूझीलंड अ संघाविरुद्ध झालेल्या वन-डे सामन्यात खलिल अहमदच्या डाव्या मनगटाला दुखापत झाली आहे. ज्या कारणामुळे तो पुढील दौऱ्यात खेळू शकणार नसल्याचं, बीसीसीआयने आपल्या पत्रकात म्हटलं आहे.

दुखापत झाल्यानंतर, डॉक्टरांनी खलिलच्या मनगटावर उपचार केले आहेत. पुढील उपचारांसाठी खलिल बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाणार आहे. न्यूझीलंड अ संघाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात खलिलने २ बळी घेतले होते, हा सामना भारत अ संघाने ९२ धावांनी जिंकला. मात्र दुसऱ्या सामन्यात बाजी मारत न्यूझीलंड अ संघाने मालिका बरोबरीत सोडवली. यानंतर भारत अ संघ न्यूझीलंडमध्ये २ चार दिवसांचे सामने खेळणार आहे.