03 April 2020

News Flash

कोलकाता नाईट रायडर्स संघात मोठे बदल, जॅक कॅलिसला मुख्य प्रशिक्षकपदावरुन हटवलं

कोलकाता संघ व्यवस्थापनाने दिली माहिती

कोलकाता नाईट रायडर्स संघाने आगामी हंगामासाठी आपल्या व्यवस्थापनात मोठे बदल करण्याचे ठरवलं आहे. मुख्य प्रशिक्षक जॅक कॅलिस आणि सहायक प्रशिक्षक सायमन कॅटीच यांना त्यांच्या पदावरुन हटवण्यात आलं आहे. कॅलिस हा कोलकाता संघाचा अविभाज्य हिस्सा आहे, मात्र आगामी हंगामासाठी आम्ही त्याच्यासाठी वेगळ्या जबाबदारीचा विचार करत आहोत, असं स्पष्टीकरण कोलकाता नाईट रायडर्स संघाचे सीईओ वेंकी मैसूर यांनी दिलं आहे.

अवश्य वाचा – धोनीच्या निवृत्तीवरुन संभ्रम कायम, मात्र आगामी आयपीएल खेळणार

२०११ पासून कॅलिस कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळाडू म्हणून सहभागी झाला. २०१५ च्या हंगामानंतर कॅलिसला कोलकात्याच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमण्यात आलं होतं. कॅलिसच्या मार्गदर्शनाखाली कोलकात्याचा संघ चार हंगामापैकी ३ हंगामात बाद फेरीत दाखल झाला होता. मात्र २०१९ साली कोलकात्याचा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीमधून बाहेर गेल्यानंतर, संघमालकांनी व्यवस्थापनाने बदल करण्याचं ठरवलं आहे.

९ वर्षांच्या कालावधीत आपल्याला पाठींबा दिल्याबद्दल कॅलिसने व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत. “खेळाडू, मार्गदर्शक आणि प्रशिक्षक या नात्याने मी संघासाठी १०० टक्के कामगिरी केली, मात्र आता मला आता नवीन संधी शोधायची आहे.” त्यामुळे कॅलिसच्या जागी कोणता खेळाडू कोलकात्याचं प्रशिक्षकपद मिळवतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – आयपीएलच्या कक्षा रुंदावणार?? अदानी-टाटा उद्योग समुह नवीन संघ विकत घेण्याच्या तयारीत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2019 5:50 pm

Web Title: kkr set to make big changes in management as they part ways with jacques kallis psd 91
टॅग Ipl,Jacques Kallis,Kkr
Next Stories
1 World Cup 2019 Final : महेला जयवर्धनेला मागे टाकत विल्यमसन ठरला यशस्वी कर्णधार
2 Video : अंतिम सामन्याआधी जेसन रॉय – पंच धर्मसेना यांचं मनोमिलन
3 धोनीच्या निवृत्तीवरुन संभ्रम कायम, मात्र आगामी आयपीएल खेळणार
Just Now!
X