08 March 2021

News Flash

‘भावा, तूच ये आणि धावा कशा करायच्या ते शिकव’; केएल राहुलचा टीकाकाराला टोला

केएल राहुल चांगला फलंदाज असला तरी त्याच्या कामगिरीत सातत्य दिसून येत नाही

क्रिकेटचा महानायक आर.अश्विन आपल्याला फॉलो करतोय यापेक्षा दिवसाची चांगली सुरूवात काय असू शकते, अशा आशयाचे ट्विट केएल राहुलने केले.

भारतीय संघाचा युवा सलामीवीर केएल राहुल सोशल मीडियावर सक्रिय असला तरी तो चाहत्यांच्या प्रतिक्रियांवर सहसा व्यक्त होत नाही. पण यावेळी पहिल्यांदाच केएल राहुलने आपल्यावर टीका करणाऱया एका ट्विटरकराचे तोंड बंद केले. २४ वर्षीय केएल राहुलच्या पाठिशी ठामपणे उभ्या असलेल्या निवड समितीने वेळोवेळी केएल राहुल भारतीय संघासाठी उत्तम सलामीवीर असल्याची ठाम भूमिका मांडली आहे. मात्र, गेल्या काही कसोटी मालिकांचा आढावा घेतला, तर केएल राहुलकडून चांगली कामगिरी पाहायला मिळालेली नाही. केएल राहुल चांगला फलंदाज असला तरी त्याच्या कामगिरीत सातत्य दिसून येत नाही, अशी टीका क्रिकेट वर्तुळात त्याच्यावर करण्यात येते. केएल राहुलच्या सध्याच्या निराशजनक कामगिरीवरून त्याला लक्ष्य करणाऱया एका ट्विटरकराला राहुलने जशास तसे प्रत्युत्तर दिले.

भारतीय संघाचा फिरकीपटू आर.अश्विन याने केएल राहुलचे ट्विटर हॅण्डल फॉलो केले आणि याची माहिती केएल राहुलने आपल्या ट्विटर हॅण्डलवर दिली. क्रिकेटचा महानायक आर.अश्विन आपल्याला फॉलो करतोय यापेक्षा दिवसाची चांगली सुरूवात काय असू शकते, अशा आशयाचे ट्विट केएल राहुलने केले. यावर प्रतिक्रिया देताना एका ट्विटरकराने केएल राहुलला त्याच्या निराशाजनक कामगिरीवरून लक्ष्य केले.
‘ते सर्व राहू दे बाजूला..धावा कशा करायच्या यावर लक्ष केंद्रीत कर’, असा खोचक टोला बिईंग चिराग दवे या ट्विटर हॅण्डलवरून लगावण्यात आला. मग केएल राहुलनेही जशास तसे प्रत्युत्तर दिले. “प्लीज मित्रा, तूच ये आणि धडे दे आम्हाला. धावा कशा करायच्या याचे गमक तुला नक्कीच ठावूक असेल”, असे ट्विट केएल राहुलने केले. त्याच्या या प्रत्युत्तरावर चाहत्यांनीही पाठिंबा दिला. केएल राहुल देखील टीकाकारांना तोडीस तोड प्रत्युत्तर देऊ शकतो, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. तर क्रिकेटपटू देखील आपल्यासारखेच सामान्य माणसंच असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येत असतात याची जाणीव आपण ठेवायला हवी, असे म्हणत आणखी एका चाहत्याने केएल राहुलला पाठिंबा दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 1:55 pm

Web Title: kl rahul lashes back at a fan on twitter
Next Stories
1 ISSF shooting World Cup : जितू रायला १० मी एअर पिस्तुलमध्ये कांस्यपदक
2 सावळ्या गोंधळात ‘महाराष्ट्र-श्री’
3 मनापासून सूचना स्वीकारण्याची वृत्ती ऑस्ट्रेलियासाठी उपयुक्त
Just Now!
X