News Flash

भारताच्या क्रिकेट संघात एकजुट नाही – मोहम्मद कैफ

भारतीय संघात अधिक समन्वय गरजेचा

मैदानात अफलातून क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जाणारा भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने Helo अ‍ॅपवर केलेल्या लाईव्हमध्ये सध्याच्या भारतीय संघाबद्दल आपले विचार मांडते. कैफच्या मते सध्याच्या भारतीय संघात एकजुटतेचा अभाव आहे. सतत खेळाडूंची होणारी अदलाबदली आणि सतत नवे नवे खेळाडू संघात येणे यामुळे भारताचा संघ अजूनही हवा तसा तयार झाला नाहीये. त्यामुळे सर्व महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला म्हणावी तशी कामगिरी करत नाहीय. २०१३ नंतर भारताने आयसीसीची कोणतीही मोठी स्पर्धा जिंकली नाहीय. यातून हे स्पष्ट दिसून येतंय की भारतीय संघामध्ये एकजुटपणाची कमतरता जाणवत आहे.

“आमच्यावेळी सौरव गांगुलीने सर्व खेळाडूंना एकत्र ठेवण्यात मोठी भूमिका बजावली होती. आजही आपण पाहिलेत तर बीसीसीआयसारख्या मोठ्या संस्थेचे अध्यक्षपद स्विकारल्यावर दादाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. पुढील काळात दादा भारतीय क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणेल असा विश्वास मला आहे.” आमच्या काळात अनेक खेळाडू आजच्यासारखे फिट नसले तरी ते उत्तम क्रिकेटर होते आणि त्यांनी स्वत:ला सिद्धही केलं होतं, कैफने आपलं मत मांडलं.

टी २० विश्वचषकाविषयी बोलताना कैफ म्हणाला की, “भारतीय संघात आता एक समन्वय येणे गरजेचे असून कोणते खेळाडू संघात खेळणार हे निश्चित करणे गरजेचे आहे. भारतीय संघाला शॉर्ट फॉरमॅटमध्ये खेळताना अनेक आव्हाने आहेत त्यामुळे विराटचे नेतृत्व आणि त्याचे निर्णय खुप महत्त्वाचे आहे. माझ्या मते भारताचा महत्त्वाचा खेळाडू महेंद्रसिंग धोनी संघात असणे गरजेचे आहे. धोनी शिवाय भारतीय संघ अपूर्ण आहे. जेव्हा धोनी स्वत: सांगेल की आता मी थकलो आता निवृत्त होतो तेव्हा मी समजेन त्याच्यातील क्रिकेट संपले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 1:37 pm

Web Title: lack of unity in current indian team says ex cricketer mohammad kaif psd 91
Next Stories
1 टी २० विश्वचषक स्पर्धा लांबणीवर?
2 “…तेव्हा सचिनला बाद केल्याचं खूप दु:ख झालं”; गोलंदाजानेच व्यक्त केली खंत
3 …तर सचिनने १,३०,००० धावा केल्या असत्या – शोएब अख्तर
Just Now!
X