21 September 2020

News Flash

सुआरेझचा दुहेरी धमाका : लिव्हरपूलचा सफाईदार विजय

प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत पुनरागमन करताना लुइस सुआरेझ याने दोन गोल केले, त्यामुळेच लिव्हरपूल संघास सुदरलँड संघावर ३-१ असा विजय मिळवता आला.

| October 1, 2013 01:03 am

प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत पुनरागमन करताना लुइस सुआरेझ याने दोन गोल केले, त्यामुळेच लिव्हरपूल संघास सुदरलँड संघावर ३-१ असा विजय मिळवता आला. या विजयासह त्यांनी साखळी गटात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
विजयाचा शिल्पकार ठरलेल्या सुआरेझने सुदरलँड संघाविरुद्धच्या लढतीत पूर्वार्ध व उत्तरार्धात प्रत्येकी एक गोल केला. लिव्हरपूल संघाला डॅनियल स्टुरीज याने आघाडी मिळवून दिली होती. सुदरलँड संघाचा एकमेव गोल ईमॅन्युअल गियाचेरिनी याने केला होता. स्पर्धेतील अन्य लढतीत वेस्ट ब्रोमवीच संघाने मँचेस्टर युनायटेड संघावर २-१ असा सनसनाटी विजय मिळविला होता, तर मँचेस्टर सिटी संघाला अ‍ॅस्टॉन व्हिला संघाने ३-२ असे हरविले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 1:03 am

Web Title: luis suarez nets two on league return as liverpool win
टॅग Football,Luis Suarez
Next Stories
1 चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा : सनरायझर्सचा अस्त!
2 संघ निवडीच्या निर्णयात सहभाग देण्याची गरज -आनंद अमृतराज
3 प्रखर गोलंदाजीमुळे सामना उत्तमरित्या जिंकलो- राहुल द्रविड
Just Now!
X