टेबल टेनिस स्पर्धा

बेलारुस खुल्या टेबल टेनिस स्पर्धेमधील २१ वर्षांखालील एकेरी गटात भारताच्या मानव ठक्कर याने कांस्यपदक पटकावले.

आतापर्यंत दमदार कामगिरीसह आगेकूच केलेल्या मानवला उपांत्य फेरीत रशियाच्या डेनिस इवोनिनकडून २-३ असा पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मानवने पहिला गेम ११-५ असा जिंकत चांगली सुरुवात केली. चौथ्या गेमला दोन्ही खेळाडूंची बरोबरी झाल्यानंतर निर्णायक पाचव्या गेमपर्यंत सामना खेचला गेला. त्यात अगदी अटीतटीच्या लढतीत मानवला ११-९ असा पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, भारताच्या हरमीतने रशियाच्या अ‍ॅलेक्सी लिव्हेनत्सोव्हवर ४-२ अशी मात करीत आगेकूच केली आहे. त्यामुळे त्याच्याकडूनही भारताला पदकाची अपेक्षा आहे.