भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर मयांक अग्रवाल मर्यादीत षटकांच्या सामन्यात भारतीय संघाकडून पदार्पण केलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध आगामी ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत शिखर धवन सहभागी होऊ शकणार नाहीये. त्याच्या गुडघ्याला झालेली दुखापत अजुनही बरी झालेली नसल्यामुळे निवड समिती आता पर्यायी सलामीवीराच्या शोधात होती. १५, १८ आणि २२ डिसेंबर या तारखेला भारत विंडीजविरुद्ध ३ वन-डे सामने खेळणार आहे.

टी-२० मालिकेत शिखर धवनच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आलेली होती. वन-डे मालिका सुरु होण्याआधी शिखर धवन दुखापतीमधून सावरेल अशी शक्यता होती, मात्र असं झालेलं नाहीये. निवड समितीने मयांक अग्रवालचं नाव पर्यायी सलामीवीराच्या जागेसाठी संघ व्यवस्थापनाला सुचवलेलं आहे. बीसीसीआयमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. अखेरीस मयांकच्या नावाला हिरवा कंदील मिळाल्यामुळे त्याची वन-डे संघात निवड करण्यात आली आहे. Cricbuzz संकेतस्थळाने याबद्दलची माहिती दिली आहे.

सध्या रणजी करंडक स्पर्धेत खेळत असलेला मयांक पहिल्या सामन्याआधी भारतीय संघात दाखल होईल, असे संकेत मिळत आहेत. गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये मयांकची कामगिरी चांगली झालेली आहे. याचसोबत स्थानिक विजय हजारे करंडक आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत मयांकने चांगली फलंदाजी केली होती. ज्यामुळे भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघात त्याची वर्णी लागू शकते.

वेस्ट इंडिजविरुद्ध वन-डे मालिकेसाठी असा असेल भारताचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार</p>