बार्सिलोनाचा अव्वल खेळाडू लिओनेल मेस्सीला करचुकवल्याच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळाला नाही. मेस्सीला सुनाविण्यात आलेली २१ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. मेस्सीसोबत त्याच्या वडिलांनाही स्पेनच्या सुप्रीम कोर्टाने करचुकवल्याच्या प्रकरणात तुरूंगवासाची शिक्षा सुनावली.

स्पेनच्या कनिष्ठ न्यायालयाने जुलै २०१६ मध्येच मेस्सीला या प्रकरणात २१ महिन्यांचा तुरूंगवास आणि ४१ लाख डॉलर्सचा दंड सुनावला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने बुधवारी झालेल्या सुनावणीत मेस्सी आणि त्याच्या वडिलांना सुनावण्यात आलेली शिक्षा कायम ठेवली. मात्र ही शिक्षा रद्द होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रथमच अहिंसात्मक गुन्ह्यत दोषी आढळणाऱ्या व्यक्तीची शिक्षा रद्द होण्याचा नियम स्पेनमध्ये आहे. त्यामुळे मेस्सीला दिलासा मिळू शकतो.

 

मेस्सी आणि त्याचे वडील जॉर्ज होरॅको मेस्सी यांनी २००७ ते २००९ या कालावधीत कमावलेल्या रकमेवरील कर चुकवण्यासाठी बेलिझे, ब्रिटन, स्वित्र्झलड आणि उरुग्वे येथे बनावट कंपन्या दाखवल्या. या प्रकरणात ते दोषी आढळले होते. डेनॉन, आदिदास, पेप्सी-कोला, प्रोक्टेर आणि गॅम्बल किंवा कुवेत खाद्यपदार्थ कंपनी यांच्याशी झालेल्या मान्यता कराराव्यतिरिक्त मेस्सीने प्रतिमा अधिकारातून मिळवलेल्या उत्पन्नाशी हे प्रकरण संबंधित होते.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]