मुंबई : आगामी क्रिकेट हंगामासाठी मुंबईच्या वरिष्ठ आणि २३-वर्षांखालील निवड समितीचे अध्यक्षपद माजी क्रिकेटपटू मिलिंद रेगे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे, महिलांच्या निवड समितीचे प्रमुखपद माजी क्रिकेटपटू वृंदा भगत यांच्याकडे देण्यात आले आहे.

७० वर्षीय रेगे यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना ३६८३ धावाांत १२६ बळी घेतले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून गुरुवारी पुरुष आणि महिलांच्या विविध वयोगटांच्या निवड समित्या जाहीर केल्या. यापैकी १९ आणि १६-वर्षांखालील निवड समितीचे अध्यक्षपद अनुक्रमे संजय पाटील आणि मंदार फडके यांना सोपवले आहे. याचप्रमाणे रवी कुलकर्णी हे १४ आणि १२-वर्षांखालील वयोगटाच्या निवड समितीचे प्रमुख असतील.

विविध निवड समित्या

*  वरिष्ठ आणि २३-वर्षांखालील : मिलिंद रेगे (अध्यक्ष), गुरू गुप्ते, श्रीधर मांडले, संजय पाटील.

* १९-वर्षांखालील : संजय पाटील (अध्यक्ष), राजेश पवार, राजेश सुतार, संतोष शिंदे, मंदार फडके.

* १६-वर्षांखालील : मंदार फडके (अध्यक्ष), मयूर कद्रेकर, पियूष सोनेजी, अशुतोष दुबे, नीलेश भोसले.

* १४, १२-वर्षांखालील : रवी कुलकर्णी (अध्यक्ष), संजीव जाधव, नीलेश पटवर्धन, गिरीश पत्की, अमोल भालेकर.

* वरिष्ठ आणि २३-वर्षांखालील महिला : वृंदा भगत (अध्यक्ष), अरुंधती घोष, सुरेखा भंडारे, संध्या रेळेकर.

* १९, १६ वर्षांखालील महिला : कल्पना मुरकर (अध्यक्ष), संगीता कामत, सीमा पुजारी, अपूर्वा कोकिळ, वीणा परळकर

* विद्यापीठ समिती : पुरुष – मंगेश दरेकर, भारत कर्णिक; महिला – आरती वैद्य, विशाखा दळवी.