30 September 2020

News Flash

पीसीबीला मिसबाहसह मी आणि शोएब संघात नकोत

भडकलेल्या हाफिजने पाकिस्तान क्रिकेट बोर्डासह प्रशिक्षक मिसबाह उल हक यांना धारेवर धरत गंभीर आरोप केले आहेत.

 

मोहम्मद हाफिजचा गंभीर आरोप

पाकिस्तानचा संघ लवकरच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संभाव्य संघाची घोषणा केली असून यात अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफिजला संधी दिलेली नाही. यामुळे भडकलेल्या हाफिजने पाकिस्तान क्रिकेट बोर्डासह प्रशिक्षक मिसबाह उल हक यांना धारेवर धरत गंभीर आरोप केले आहेत. मोहम्मद हाफिजने एका मुलाखतीतीत मिस्बाह आणि पीसीबीचा समाचार घेतला आहे. त्याने या मुलाखती दरम्यान सांगितले की, ‘मला संघ निवडीबाबत काही माहिती मिळाली आहे. मिस्बाह आणि पीसीबी माझी आणि शोएब मलिकची संघात निवड करण्याबाबत इच्छुक नाहीत. सध्या आमची त्यांना गरज वाटत नाही. ही बाब ते जाहीरपणे का सांगू शकत नाहीत? तुम्ही ही गोष्ट का लपवता? ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी माझी निवड होईल, असे मला वाटत होते. मात्र, मला संधी दिली गेली नाही. एकाच वेळी मिस्बाह दोन महत्त्वाच्या जबाबदारी कशा काय पार पाडू शकतो? मिस्बाहकडे प्रशिक्षक पदाचा अनुभव नाही. यामुळे तो कसा काय प्रशिक्षणात न्याय देऊ  शकतो’ असेही हाफिजने सांगितले.

यावेळी त्याने ट्वेंन्टी २० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलेल्या बाबर आझमला शुभेच्छा दिल्या. दरम्यान, मिस्बाह उल हक यांनी सप्टेंबरमध्ये संघाच्या मुख्यप्रशिक्षक पदासह निवड समितीचीही जबाबदारी पार पाडत आहे. मिस्बाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानचा मायदेशात ट्वेंन्टी २० मालिकेत ३-० ने पराभव केला. त्यानंतर सरफराज अहमद याची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 3:49 am

Web Title: mohammad hafeez allegations on pcb and misbah ul haq zws 70
Next Stories
1 ट्वेंन्टी २० विश्वचषकात पीएनजी असणार नवा संघ 
2 धोनीच्या निवृत्तीवर बोलणाऱ्यांना शास्त्रींनी सुनावले
3 सात्त्विक -चिराग अंतिम फेरीत पराभूत
Just Now!
X