News Flash

कतरीना बरोबरच्या नात्याबद्दल मोहम्मद कैफ म्हणतो…

क्रिकेटपटू मोहम्मद कैफ आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्याबाबत ट्विटरवर चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.

बॉलिवूड आणि क्रिकेट हे दोन विषय भारतात सर्वाधिक चर्चिले जातात. अनेकदा या दोन क्षेत्रांमधील काही खास नातीदेखील पाहायला मिळतात. या चर्चा रंगल्या की आपोआपच क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा, क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि अभनेत्री गीता बसरा, क्रिकेटपटू जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाडगे अशा अनेक जोड्या डोळ्यापुढे येतात. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शात्री आणि अभिनेत्री निमरत कौर हा देखील काही दिवस अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला. यातच आता क्रिकेटपटू मोहम्मद कैफ आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्याबाबतही ट्विटरवर चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.

‘आस्क कैफ’ या अंतर्गत एका चाहत्याने मोहम्मद कैफ याला कतरिना कैफबाबत प्रश्न विचारला. ‘मोहम्मद कैफ सर, तुम्ही अभिनेत्री कतरिना कैफ यांचे नातेवाईक आहात का? आणि जर नसाल तर भविष्यात त्यांच्याशी तुमचे काही नाते प्रस्थापित होऊ शकते का?’ असा प्रश्न एका चाहत्याने मोहम्मद कैफ याला ट्विटरवर विचारला.

त्यावर, ‘मी कतरिनाचा नातेवाईक नाही आणि मी माझ्या वैवाहिक जीवनात सुखी आहे’, असे कैफने अत्यंत सुंदर उत्तर दिले.

कतरिनाला तिचे कैफ हे आडनाव कसे मिळाले याबाबत मी एक गोष्ट ऐकली आहे. त्या गोष्टीनुसार तिचे माझ्या आडनावाशी मात्र काही तरी नाते असावे, असे तो म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2018 4:53 pm

Web Title: mohammad kaif talks about relation with actress katrina kaif
टॅग : Katrina Kaif
Next Stories
1 …म्हणून इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ अपयशी – महेंद्रसिंग धोनी
2 Asia Cup 2018 Blog : मधल्या फळीवर भारताची मदार, इंग्लंड दौऱ्यातून संघ बोध घेईल?
3 World Masters : प्रेरणादायी! १०२ वर्षाच्या भारतीय आजीबाईंनी धावण्याच्या स्पर्धेत जिंकले सुवर्ण
Just Now!
X