News Flash

पाकिस्तानच्या विजयात मोहम्मद इरफान चमकला

वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने घेतलेल्या ४ विकेट्सच्या जोरावर पाकिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ६ विकेट्सनी मात केली.

| March 17, 2013 03:03 am

वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने घेतलेल्या ४ विकेट्सच्या जोरावर पाकिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ६ विकेट्सनी मात केली. पावसामुळे प्रत्येकी ४४ षटकांच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची प्रथम फलंदाजी करताना घसरगुंडी उडाली. दक्षिण आफ्रिकेतर्फे फरहाद बेहराडीनने सर्वाधिक ५८ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना मिसबाह उल हकने नाबाद ५७ धावांची खेळी करत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने १-१ अशी बरोबरी केली आहे. मोहम्मद इरफानला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 3:03 am

Web Title: mohmmd irfan briten in pakistan win
टॅग : Sports
Next Stories
1 न्यूझीलंडवर फॉलोऑनची नामुष्की
2 ईडी कोवनचे चॅपेलना प्रत्युत्तर
3 हेराथसमोर बांगलादेशची घसरगुंडी
Just Now!
X