भारत विरुद्ध पाकिस्तामध्ये आशिया चषक सामन्यामध्ये झालेला दुसरा सामनाही एकतर्फी झाला. भारताने ९ गडी राखून हा सामना जिंकला. कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध भारताला रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या धडाकेबाज खेळीमुळे सहज विजय मिळाला. या सामन्यात भारतासाठी विजयी धाव घेणाऱ्या अंबाती रायडूचा वाढदिवसही त्याच दिवशी होता. त्यामुळे हा दिवस रायडूसाठी खासच ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानविरुद्ध मिळालेले सलग दोन विजय आणि त्यातही संघसहकाऱ्याचा वाढदिवस असा दुहेरी योग जुळून आल्याने भारतीय संघाने सामना जिंकल्यानंतर रायडूचा वाढदिवस एकदम दणक्यात साजरा केला. या सेलिब्रेशनचे दोन फोटो भारतीय क्रिकेट संघाच्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवर पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये बर्थ डे बॉय रायडूने केक कापताच धोनी त्याच्या चेहऱ्यावर केक लावताना दिसत आहे. मैदानातील प्रत्येक स्थितीमध्ये शांत असणाऱ्या धोनीचा हा उत्साही अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच आवडल्याचे कमेन्ट्समधून दिसत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni leads dressing room celebrations of ambati rayudus birthday
First published on: 25-09-2018 at 16:18 IST