News Flash

मैदानातील स्वतःच्या स्टँडचं उद्घाटन करायला धोनीचा नकार, म्हणाला मी तर घरातलाच माणूस !

रांचीच्या मैदानावर स्टँडला धोनीचं नाव

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा वन-डे सामना शुक्रवारी रांचीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या घरच्या मैदानावर हा सामना खेळवण्यात येत असल्यामुळे या सामन्यात धोनी कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. नुकतच रांचीच्या मैदानावरील एका स्टँडला एम.एस.धोनी पॅव्हेलियन असं नाव देण्यात आलं. या स्टँडचं उद्घाटन धोनीच्या हस्ते करण्याचा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र धोनीने याला स्पष्ट नकार दिला आहे.

झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत, मैदानाच्या साऊथ पॅव्हेलियनला धोनीचं नाव देण्यावर एकमत झालं. याचं उद्घाटन करण्याबद्दल विचारलं असता धोनीने अतिशय नम्रपणे याला नकार दिला. “दादा, मी तर याच मैदानाचा भाग आहे. घरातलाच मुलगा उद्घाटन कसं करेल?” अशा शब्दांमध्ये धोनीने झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना नकार दिला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

५ सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या २-० ने आघाडीवर आहे. तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवल्यास भारत मालिकेत विजयी आघाडी घेईल. वन-डे विश्वचषकाआधी भारतीय संघाची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका असल्यामुळे यामध्ये भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 3:33 pm

Web Title: ms dhoni politely turned down the request to inaugurate his own stand
टॅग : Ind Vs Aus,Ms Dhoni
Next Stories
1 All England Championships: चुरशीच्या लढतीत सायना विजयी
2 सय्यद मुश्ताक अली टी-२० : अजिंक्य रहाणेची माघार, श्रेयस अय्यर मुंबईचा कर्णधार
3 IND vs ENG : भारतीय महिला पराभूत; इंग्लंडची मालिकेत विजयी आघाडी
Just Now!
X