News Flash

भारतीय संघाने घेतला धोनीच्या घरी पाहुणचार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

रांचीच्या मैदानात रंगणार तिसरा सामना

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वन-डे मालिकेचा तिसरा सामना शुक्रवारी रांचीच्या मैदानावर रंगणार आहे. पहिले २ सामने जिंकत भारताने या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. महेंद्रसिंह धोनीच्या घरच्या मैदानावर हा सामना होत असल्यामुळे, त्याच्या कामगिरीकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत. या सामन्याआधी धोनीने आपल्या सर्व सहकाऱ्यांना घरी जेवायचं आमंत्रण दिलं होतं. यावेळी पत्नी साक्षीसह धोनीने आपल्या सहकाऱ्यांचं आदरातिथ्य केलं. भारतीय संघाच्या या अनौपचारिक भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

कर्णधार विराट कोहलीने याबद्दल आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक खास फोटो शेअर करत धोनीचे आभार मानले आहेत.

तिसरा सामना जिंकल्यास भारत या मालिकेत विजयी आघाडी घेऊ शकतो. विश्वचषकाआधी भारतीय संघाची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका असल्यामुळे या मालिकेत भारत कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – मैदानातील स्वतःच्या स्टँडचं उद्घाटन करायला धोनीचा नकार, म्हणाला मी तर घरातलाच माणूस !

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 4:02 pm

Web Title: ms dhoni sakshi dhoni host indian cricket team in ranchi
Next Stories
1 मैदानातील स्वतःच्या स्टँडचं उद्घाटन करायला धोनीचा नकार, म्हणाला मी तर घरातलाच माणूस !
2 All England Championships: चुरशीच्या लढतीत सायना विजयी
3 सय्यद मुश्ताक अली टी-२० : अजिंक्य रहाणेची माघार, श्रेयस अय्यर मुंबईचा कर्णधार
Just Now!
X