News Flash

धोनीने २०१९ विश्वचषकानंतर निवृत्त व्हायला हवं होतं – शोएब अख्तर

धोनी इतका वेळ का थांबला आहे माहिती नाही - अख्तर

१४ ) महेंद्रसिंह धोनी - ९८ सामन्यांमध्ये १ वेळा शून्यावर बाद

२०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर निवड समितीने धोनीला विश्रांती देत ऋषभ पंतला संघात संधी दिली. संपूर्ण स्पर्धेच धोनीची संथ फलंदाजी हा चर्चेचा विषय होता. ऋषभ पंत भारतीय संघात आल्यापासून, धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. आजही धोनीच्या निवृत्तीविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरु असते. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरच्या मते धोनीने आपली निवृत्ती विनाकारण लांबवली असून त्याला २०१९ विश्वचषकानंतर निवृत्त व्हायला हवं होतं.

“धोनीने आतापर्यंत त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त भारतीय संघासाठी केलं आहे. त्याने सन्मानाने निवृत्ती स्विकारायला हवी होती. तो इतका वेळ का थांबला आहे मला माहिती नाही. त्याने विश्वचषकानंतरच निवृत्त व्हायला हवं होतं. मी त्याच्या जागी असतो तर मी आतापर्यंत कधीच निवृत्त झालो असतो. २०११ विश्वचषकानंतरही मी ३-४ वर्ष सहज मर्यादीत षटकांचं क्रिकेट खेळू शकत होतो, पण त्या दरम्यान मी तंदुरुस्त नव्हतो. मग अशा परिस्थितीत उगाच खेचण्यात काही अर्थ नसतो.” अख्तर पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होता.

विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात तो संघाला सामना जिंकवू शकला नाही, त्याच क्षणी त्याने समजायला हवं होतं. निवृत्तीसाठी तो इतका वेळ का लावतो आहे हे तोच सांगू शकतो. त्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी जे केलं आहे ते पाहता, त्याला योग्य पद्धतीने निरोपाचा सामना मिळणं गरजेचं आहे. एक खेळाडू आणि माणूस म्हणूनही धोनी चांगला आहे, पण सध्या तो अडकलेला वाटतो, अख्तरने धोनीच्या निवृत्तीविषयी आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – आयपीएल रद्द झाल्यास धोनीला टी-२० विश्वचषकात संधी मिळण्याची शक्यता कमीच !

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2020 2:35 pm

Web Title: ms dhoni should have retire after 2019 world cup says former pakistani bowler shoaib akhtar psd 91
Next Stories
1 आयपीएल रद्द झाल्यास धोनीला टी-२० विश्वचषकात संधी मिळण्याची शक्यता कमीच !
2 आयपीएल विसरुन जा, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचे सूचक संकेत
3 Wisden च्या यादीत रोहित शर्माला स्थान नाही, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण म्हणतो…
Just Now!
X