करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. लवकरात लवकर क्रीडा स्पर्धा सुरू व्हाव्यात आणि नवोदित खेळाडूंना संधी मिळावी अशी भावना सर्व क्रीडापटूंच्या मनात आहे. क्रिकेटचे सामने पुन्हा सुरू झाले की मी माझ्यावर करण्यात आलेल्या टीकेला माझ्या बॅटनेच उत्तर देईन, असे मत भारताचा उदयोन्मुख खेळाडू पृथ्वी शॉ याने व्यक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Coronavirus : क्रीडाविश्वावर शोककळा! महान क्रिडापटूचे उपचारादरम्यान निधन

“१९ वर्षाखालील युवा विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवणे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत पहिल्याच सामन्यात शतक ठोकणे या दोनही गोष्टी माझ्यासाठी खूपच खास आहेत. पण मला माझ्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही हे देखील तितकेच खरे आहे. बंदी असलेल्या पदार्थाचे सेवन टाळणे हे माझ्या हातात होते, पण घोट्याची झालेली दुखापत माझ्या नियंत्रणात नव्हती. मला आता एक गोष्ट कळून चुकली आहे की मी १०० टक्के लोकांना सर्वकाळ खुश ठेवू शकत नाही”, असे पृथ्वीने स्पष्ट केले.

विराटला धक्का! बेन स्टोक्सने केला दमदार विक्रम

“खेळावर आणि कामगिरीवर टीका होणे हा खेळाचाच एक भाग आहे. सध्या मी त्याबाबत एक योजना आखली आहे की जे लोक माझ्यावर टीका करतात त्यांच्या टीकांना सकारात्मक दृष्टीकोनातून बघायचं आणि त्यांनी सांगितलेल्या चुकांवर मेहनत घेऊन त्या चुका दुरूस्त करायच्या. २०१९ हे वर्ष माझ्यासाठी फारसं चांगलं गेलं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात असा काळ येतोच, पण आता मी तोंडाची वाफ दवडणार नाही, टीकाकारांना थेट माझ्या बॅटनेच उत्तर देईन”, अशा शब्दात त्याने आपला निर्धार व्यक्त केला.

हार्दिक पांड्याच्या ‘कॉफी विथ करण’ प्रकरणावर युवराजचं सडेतोड मत, म्हणाला…

पृथ्वी शॉ ने पदार्पण केल्यानंतर तो आधी दुखापतीमुळे आणि नंतर बंदीच्या शिक्षेमुळे दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर रोहित शर्मा आणि शिखर धवन हे दोघेही दुखापतग्रस्त असल्याने त्याला मयंक अग्रवालसोबत न्यूझीलंड दौऱ्यावर सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती, पण त्याला चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai cricketer prithvi shaw says will respond to criticism with bat after coronavirus lockdown ends vjb
First published on: 09-04-2020 at 12:44 IST