विश्वचषकाआधी भारतीय संघाच्या फलंदाजीची घडी व्यवस्थित बसवणं हे मोठं आव्हान सध्या भारतीय संघ व्यवस्थापनासमोर आहे. सलामीवीरांच्या कामगिरीतलं सातत्य, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोणी यायचं या सर्व प्रश्नांची ठोस उत्तर अजुनही मिळालेली नाहीयेत. मध्यंतरी कर्णधार विराट कोहली विश्वचषक आणि त्याआधीच्या काही सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो असं मत प्रशिक्षत रवी शास्त्री यांनी मांडलं होतं. काही माजी खेळाडूंनी शास्त्री यांच्या मताशी सहमती दर्शवली तर काहींनी याचा विरोध केला. मात्र विराटच्या मते, “आपण तिसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर आल्यामुळे आपल्या खेळात बदल होणार नाहीये.”

एखाद्या सामन्यात संघाला माझी गरज चौथ्या क्रमांकावर असेल तर मी आनंदाने त्या जागेवर फलंदाजीसाठी तयार आहे. मी याआधीही चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे, त्यामुळे मला यासाठी काही विशेष मेहनत घ्यायची नाहीये. तिसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आल्यामुळे माझा खेळ बदलणार नाहीये.” ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत विराट बोलत होता.

अवश्य वाचा – आयपीएलमधली कामगिरी म्हणजे विश्वचषकाचं तिकीट नाही – विराट कोहली

घरच्या मैदानावर झालेल्या टी-20 मालिकेत भारत संघाला पराभव स्विकारावा लागला. शनिवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 वन-डे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. विश्वचषकाआधी भारतीय संघाची ही अखेरची वन-डे मालिका असल्यामुळे या मालिकेत भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : विश्वचषकाआधी भारतीय संघाची शेवटची चाचणी परीक्षा