News Flash

नदालची विजयी सलामी

ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतील अंतिम लढतीत पराभूत होणाऱ्या राफेल नदालने रिओ खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली.

| February 20, 2014 04:31 am

नदालची विजयी सलामी

ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतील अंतिम लढतीत पराभूत होणाऱ्या राफेल नदालने रिओ खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. त्याने स्पेनच्या डॅनियल गिमेनो ट्रेव्हरचा ६-३, ७-५ असा पराभव केला.
ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील अंतिम लढतीत स्विस खेळाडू स्टॅनिस्लास वॉवरिन्कने नदालवर सनसनाटी मात केली होती. त्यानंतर नदालने पाठीच्या दुखण्यामुळे ब्यूनस आयर्स येथील स्पर्धेतून माघार घेतली होती. रिओ येथील स्पध्रेत सहभागी होत त्याने आपल्या कारकीर्दीतील ८००व्या सामन्यात खेळण्याचा मान मिळवला. कारकीर्दीत ८०० किंवा त्यापेक्षा जास्त एटीपी सामने खेळणारा तो सातवा खेळाडू आहे. यापूर्वी रॉजर फेडरर, लिटन ह्य़ुइट, टॉमी हास, डेव्हिड फेरर व निकोलाय डेव्हिडेन्को यांनी ही कामगिरी केली आहे.
नदालला आपलाच सहकारी अलबर्ट मोन्टानेस याच्याशी खेळावे लागणार आहे. अलबर्टने डच खेळाडू रॉबिन हासला ६-१, ७-६ (७-४) असे पराभूत केले. डेव्हिड फेररने आव्हान राखताना फ्रान्सच्या जेरेमी चार्डीला ६-२, ६-३ असे हरविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2014 4:31 am

Web Title: nadals back with win in first round of rio open
टॅग : Rafael Nadal,Tennis
Next Stories
1 जागतिक मोटार रॅली मानांकनात संजय टकलेंना ६४वे स्थान
2 सोमदेव उपांत्यपूर्व फेरीत
3 हिवाळी ऑलिम्पिक स्लालोम शर्यतीत हिमांशूला ७२वे स्थान
Just Now!
X