News Flash

राष्ट्रीय हॉकी स्पर्धा आता नव्या स्वरूपात!

हॉकी इंडियाच्या कार्यकारी मंडळाच्या झालेल्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला.

हॉकी (प्रातिनिधिक फोटो)

जास्तीत जास्त खेळाडूंचा सहभात तसेच राज्य, केंद्रशासित प्रदेश, संस्थात्मक आणि विद्यापीठांच्या संघांमधील हॉकीच्या सुधारणेसाठी आता स्थानिक स्पर्धामध्ये धोरणात्मक बदल केले जाणार आहे. त्यामुळेच पुढील वर्षीपासून राष्ट्रीय हॉकी स्पर्धा नव्या स्वरूपानुसार खेळवण्याचे हॉकी इंडियाने ठरवले आहे.

हॉकी इंडियाच्या कार्यकारी मंडळाच्या झालेल्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला. पुरुष आणि महिला गटाच्या उपकनिष्ठ, कनिष्ठ आणि वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा नव्या धोरणानुसार खेळवण्यात येतील. सर्व स्पर्धा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या नव्या नियमानुसार खेळवण्यात येतील.

‘‘यापूर्वी अ आणि ब गटासाठी असलेली विविध वयोगटांची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची पद्धत यापुढे नसेल. राष्ट्रीय स्पर्धेसाठी आता आम्ही नवी नियमावली सादर केली आहे. यामुळे प्रत्येक राज्याला आपल्या प्रदेशातील हॉकी खेळाला चालना देता येईल. या सर्व स्पर्धा लीग आणि नंतर बाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहेत. सहभागी संघांनुसार गटवारी करण्यात येईल,’’ असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी सांगितले.

हॉकी इंडियाचे नवे स्वरूप –

* कोणत्याही खेळाडूला राष्ट्रीय स्पर्धेत फक्त एकाच गटात आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करता येईल. त्यामुळे नवीन खेळाडूंना संधी मिळू शकेल.

* पात्रता प्रक्रियेसाठी प्रत्येक राज्याने राष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी व्हायला हवे.

* प्रत्येक राज्याने प्रत्येक गटाच्या राज्यस्तरीय स्पर्धाचे आयोजन करणे बंधनकारक राहील.

* सार्वजनिक क्षेत्रातील तसेच विद्यापीठाच्या संघांना आता वेगळ्या गटात स्थान देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 12:08 am

Web Title: national hockey tournament now in new form abn 97
Next Stories
1 ‘चेन्नई हा विशेष संघ – विजय
2 जेव्हा शमी लॉकडाउनमध्ये अडकलेल्या मजुराचा जीव वाचवतो…
3 लॉकडाउनमुळे जगभरात क्रिकेट ठप्प, तरीही भारतीय महिला २०२१ विश्वचषकासाठी पात्र
Just Now!
X