News Flash

भारताविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर, संघात ९ खेळाडूंनाच स्थान

ब्रूम, निशमला वगळलं

केन विल्यमसनकडे न्यूझीलंडच्या संघाचं नेतृत्व

भारताविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंडने आज आपल्या संघाची घोषणा केली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने केवळ ९ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. उर्वरित ६ खेळाडू हे सध्या भारताविरुद्ध सुरु असलेल्या न्यूझीलंड ‘अ’ संघामधून भरवले जाणार आहे. सध्या न्यूझीलंड ‘अ’ संघ भारत दौऱ्यावर आहे.

२२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. पहिला वन-डे सामना हा मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. यानंतर पुणे आणि कानपूर येथेही वन-डे सामने खेळवले जाणार आहेत.

अवश्य वाचा – रोहित शर्मा ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू

निल ब्रूम आणि जिमी निशम या दोन खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलेलं नाहीये. भारतीय दौऱ्यासाठी न्यूझीलंडच्या क्रिकेट बोर्डाने हा खास प्रयोग करण्याचं ठरवलं आहे.

असा असेल भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ –

मार्टीन गप्टील, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, कोलीन डी ग्रँडहोम, मिचेल सँटनर, टीम साऊदी, अॅडम मिलने, ट्रेंट बोल्ट

अवश्य वाचा – Video: मनिष पांडेचा हा झेल पाहिलात का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2017 3:47 pm

Web Title: new zealand team announced their 9 member squad team for india tour rest of the 6 players to be selected from new zealand a team against india
Next Stories
1 यहां के हम सिकंदर! वन-डे क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर
2 इंदूरच्या मैदानावर विक्रमांचा दुहेरी षटकार
3 आयपीएलच्या लिलावात धोनीला विकत घेण्यासाठी रंगणार स्पर्धा ?
Just Now!
X