News Flash

World Cup 2019 च्या अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडला ‘स्पिरीट ऑफ क्रिकेट’ पुरस्कार

अंतिम सामन्यात चौकार-षटकारांच्या संख्येवर देण्यात आला होता निर्णय

केन विल्यम्सन

विश्वचषक स्पर्धा २०१९ च्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले.

WC Final : ‘माफ करा, आम्हाला जिंकता आलं नाही’; ट्रेंट बोल्टला भावना अनावर

World Cup 2019 च्या अंतिम सामन्याच्या निकालावरून ICC वर जोरदार टीका करण्यात आली. ‘त्या’ नियमामुळे एका संघावर अन्याय होत आहे, अशी भावना व्यक्त होत होती. पण न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनी मात्र तो निर्णय खिलाडूवृत्तीने स्वीकारला. त्यामुळे न्यूझीलंडला यंदाचा मार्टीन-जेन्कीन्स स्पिरीट ऑफ क्रिकेट पुरस्कार देण्यात आला. विजेत्याची निवड करण्यासाठी तयार केलेल्या समितीने न्यूझीलंडच्या खिलाडूवृत्तीमुळे त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. २०१३ सालापासून MCC तर्फे हा पुसस्कार दिला जातो.

दरम्यान, अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय फसला. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडला केवळ २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ धावांची खेळी केली. तर डावाच्या शेवटच्या टप्प्यात टॉम लॅथम याने ४७ धावांची उपयुक्त खेळी केली. इतर फलंदाजांना मात्र चांगली खेळी करता आली नाही. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट या दोघांनी ३-३ बळी टिपले.

कमनशिबी फॅन! ५० तासांच्या प्रवासानंतरही ‘सुपर-ओव्हर’ला मुकला…

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. सामन्यात बटलर बाद झाल्यावर इंग्लंडच्या आशा काहीशा मावळल्या पण स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला, त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 11:55 am

Web Title: new zealand win spirit of cricket award for world cup final response vjb 91
Next Stories
1 हॅरिस शील्ड क्रिकेट स्पर्धा : रिझवी शाळेचे आव्हान संपुष्टात
2 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताची २७ पदकांची लयलूट
3 माझ्या यशाचे श्रेय वडिलांना!
Just Now!
X