पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जोपर्यंत थांबत नाही, तो पर्यंत या दोन देशांमध्ये कोणत्याही प्रकारचे क्रीडा सामने खेळवण्यात येणार नाहीत, असे IPLचे कमिशनर राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे. पुलवामा येथील दाहासातवाडी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने प्रत्येक पातळीवर पाकिस्तानशी असलेले संबंध तोडून टाकण्याची सुरुवात केली आहे. त्यातच या दोन देशांमध्ये कोणत्याही प्रकारचे क्रीडा सामने होणार नाहीत, असे शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे.

”पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान यांचे मुंबईतील छायाचित्र झाकणे, पाकिस्तानचा ‘मोस्ट फेव्हर्ड कंट्री’चा दर्जा काढून घेणे यावरून भारतीयांच्या भावनांचा उद्रेक दिसून आला. त्यांच्या प्रतिक्रियांच त्यांच्या मनात असलेला रोष व्यक्त करत आहेत. खेळ हा राजकारणापेक्षा मोठा आहे, असे मी नेहमी म्हणतो. राजकारण आणि क्रिकेट यांची सळमिसळ केली जाऊ नये असे मलाही वाटते. पण पाकिस्तानशी पुन्हा क्रिकेट खेळण्याबाबतचा विचार करण्याआधी पाकिस्तानला या दहशतवादी कारवाया थांबवाव्या लागतील”, असे शुक्ला म्हणाले.

ICC World कप २०१९ मध्ये भारत पाकिस्तानशी एकदिवसीय सामना खेळेल की नाही, हे आताच सांगणे कठीण आहे. याबाबतचा निर्णय सरकारशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.