इंग्लंडच्या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. ४८२ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव २३९ धावांवरच आटोपला. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर २४२ धावांनी दणदणीत विजय मिळवला असून इंग्लंडचा वन डेतील हा विक्रमी विजय ठरला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा पराभव ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नॉटिंगहॅम येथे मंगळवारी यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलया यांच्यात तिसरा वन डे सामना पार पडला. या सामन्यात पहिले फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने पुरुष वन-डे इतिहासातली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. इंग्लंडच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. सलामीवीर जेसन रॉय (८२ धावा), जॉनी बेअरस्ट्रो (१३९ धावा), अॅलेक्स हेल्स (१४७ धावा) आणि कर्णधार इयॉन मॉर्गनच्या ६७ धावांच्या खेळीने इंग्लंडने ५० षटकांत ६ विकेट गमावत ४८१ धावांचा डोंगरच उभा केला.

४८२ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचे फलंदाज चमकदार कामगिरी करु शकले नाही. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड (५५) आणि मार्कस स्टॉइनिस (४४ धावा) या दोघांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर फार काळ तग धरु शकले नाही. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ३७ षटकांमध्ये २३९ धावा करुन माघारी परतला. इंग्लंडतर्फे आदिल रशिदने ४ तर मोईन अलीने ३ विकेट घेतल्या. विलीने दोन विकेट घेतल्या.

वन-डे इतिहासात इंग्लंडकडून सर्वोच्च धावसंख्येंची नोंद

इंग्लंडने या सामन्यात २४२ धावांनी विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत ३- ० अशी विजयी आघाडी घेतली आहे. १४७ धावा ठोकणाऱ्या अॅलेक्स हेल्सला (१४७ धावा) सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nottingham one day england beat australia by 242 runs largest runs victory australias largest runs defeat
First published on: 20-06-2018 at 02:38 IST