News Flash

जोकोव्हिचचा धक्कादायक पराभव

निक कुर्यिगासचा विजय; राफेल नदाल उपांत्य फेरीत

निक कुर्यिगासचा विजय; राफेल नदाल उपांत्य फेरीत

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचला मेक्सिको खुल्या टेनिस स्पध्रेत शुक्रवारी धक्कादायक निकालाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या निक कुर्यिगासने एटीपी टेनिस स्पध्रेत जोकोव्हिचचा पहिल्यांदाच सामना करताना ७-६ (११/९), ७-५ असा विजय मिळवून धक्कादायक निकाल नोंदवला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेतील उपविजेत्या राफेल नदालने योशिहिटो निशिओकावर सरळ सेटमध्ये विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

ऑस्ट्रेलियन खुल्या स्पध्रेत दुसऱ्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागल्यानंतर जोकोव्हिच पहिल्यांदाच स्पध्रेत सहभागी झाला होता. मात्र उपांत्यपूर्व फेरीतील या लढतीत एक तास ४७ मिनिटांच्या संघर्षांनंतर त्याला पराभव पत्करावा लागला.

पुढील फेरीत कुर्यिगासला अमेरिकेच्या सॅम क्युरीचे आव्हान पेलावे लागणार आहे. दुसऱ्या लढतीत नदालने दमदार खेळ करताना निशिओकावर ७-६ (७/२), ६-३ असा विजय मिळवला. ‘‘तो फार जलद होता. त्याचे आक्रमण थोपवण्यासाठी मला योग्य फटक्यांची निवड करावी लागली. त्यामुळे लयबद्ध खेळ करणे आव्हानात्मक होत होते,’’ असे नदाल म्हणाला. उपांत्य फेरीत नदालसमोर मारिन चिलीचचे आव्हान आहे. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेला नदाल सलग १३ सामन्यांत अपराजित आहे.

श्रीकांतच्या पराभवासह भारताचे आव्हान संपुष्टात

पीटीआय : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतला जर्मन खुल्या ग्रां. प्रि. गोल्ड स्पध्रेत उपउपांत्यपूर्व फेरीत कडव्या झुंजीनंतरही पराभवाला सामोरे जावे लागले. ऑलिम्पिक विजेत्या चीनच्या चेन लाँगने श्रीकांतचा २१-१९, २२-२० असा पराभव केला. या पराभवानंतर स्पध्रेतील भारताचे आव्हानही संपुष्टात आले. १२व्या मानांकित श्रीकांतने ४७ मिनिटे लाँगला झुंजवले.

घोटय़ाच्या दुखापतीतून सावरताना श्रीकांतने दमदार पुनरागमन केले आणि दोन गेममध्ये १२-६ व १६-१२ अशी आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या मानांकित लाँगने पिछाडीवरून मुसंडी मारत श्रीकांतवर मात केली.

पहिल्या गेममध्ये श्रीकांतने ३-० अशी झटपट आघाडी घेतली आणि सातत्यपूर्ण खेळ करून ती १२-६ अशी मजबूत केली. मात्र लाँगने अप्रतिम खेळ करताना सामन्याचे नूर पालटले आणि १९-१७ अशी आघाडी घेतली. त्यानंतर श्रीकांतनेही दोन गुण घेत गेम १९-१९ असा बरोबरीत आणला; परंतु लाँगने पुढील दोन्ही गुण घेत गेम जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये लाँगने ९-५ अशा आघाडीसह विजयाकडे कूच केली, परंतु श्रीकांतने सलग सात गुणांची कमाई केली. श्रीकांतने १६-१२ अशी आघाडी घेतली होती, मात्र चीनच्या खेळाडूने लौकिकास साजेसा खेळ करताना विजयश्री खेचून आणली. भारताच्या शुभंकर डेलाही पराभवाचा सामना करावा लागला. पाचव्या मानांकित हाँगकाँगच्या एनजी कॅ लाँग अँगसने २१-१४, २१-८ अशा फरकाने शुभंकरचा, तर हाँगकाँगच्याच हू यूनने २१-१५, २१-११ अशा फरकाने हर्षित अगरवालचा पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 2:54 am

Web Title: novak djokovic rafael nadal
Next Stories
1 वेगवान कोलमन..
2 ‘कोहली जीनिअस तर केएल राहुल माझा आवडता फलंदाज’
3 सौरव गांगुलीने केलेला चमत्कार कोहलीही करणार का?
Just Now!
X