उज्जन, मध्य प्रदेश येथे ३ ते ७ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरता महाराष्ट्राच्या संघाची घोषणा करण्यात आली असून, नेहा सांगलीकर आणि सौरभ मोहितकडे नेतृत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.

मुलींचा संघ : नेहा सांगलीकर (कर्णधार), निकिता उत्तेकर, पल्लवी जाधव, वीणा पाटील, मानसी सावंत, अलीशा पटेल, एलिस्का अल्मेडा, मानसी वासट, माधुरी गवंडी, तेजश्री सारंग, तस्मीन बुरोंडकर, वंदना पवार. प्रशिक्षक- मिलिंद सावंत. कुमार संघ : सौरभ मोहिते (कर्णधार), शुभम शिंदे, अजिंक्य पवार, रोशन वैती, नरेश धिंडले, संदीप राठोड, सतीश ऐतवडे, शुभम धुरी, कृष्णा मदने, महेश बालवडकर, अक्षय सोनी, गिरीश चव्हाण. प्रशिक्षक – महादेव रकटे.