News Flash

पी. व्ही. सिंधूचे आव्हान संपुष्टात

पी. व्ही. सिंधूचे इंडोनेशिया बॅडमिंटन स्पध्रेच्या तिसरी फेरीत आव्हान संपुष्टात आले.

पी. व्ही. सिंधू

इंडोनेशिया मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धा
गेल्याच आठवडय़ात मकाऊ खुल्या ग्रां. प्रि. गोल्ड स्पध्रेचे विजेतेपद पटकावणाऱ्या अग्रमानांकित पी. व्ही. सिंधूचे इंडोनेशिया मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पध्रेच्या तिसरी फेरीत आव्हान संपुष्टात आले. पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीतील नवव्या स्थानावरील श्रीकांतने उपांत्य फेरी गाठली आहे, तर आठवा मानांकित आरएमव्ही गुरुसाईदत्त पराभूत झाला आहे.
जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत दोनदा कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूकडून इंडोनेशियामधील स्पध्रेत मोठय़ा अपेक्षा केल्या जात होत्या. मात्र चीनच्या ही बिंगजियाओने २३-२१, २१-१३ असा तिचा पराभव केला. पुरुषांमध्ये भारताच्या अग्रमानांकित श्रीकांतने मलेशियाच्या १५व्या मानांकित टेक झि सो याचा २१-१०, २१-५ असा पराभव केला. तर मलेशियाच्या इस्कंदर झुल्करनैन झैनुद्दीनने गुरुसाइदत्तवर २१-१४, १७-२१, २१-१५ असा विजय मिळवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2015 2:37 am

Web Title: p v sindhu challenge ended in indonesia grand masters pre gold badminton tournament
टॅग : P V Sindhu
Next Stories
1 फिफाचे आणखी १६ अधिकारी भ्रष्टाचारी!
2 सर्वोत्तम महिला बॅडमिंटनपटूच्या पुरस्कारासाठी सायनाला नामांकन
3 आनंदचा पहिला सामना अ‍ॅडम्ससोबत
Just Now!
X